


✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.21ऑगस्ट):-तालुक्यातील मांडवा येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री , जलसंधारणाचे प्रणेते सुधाकररावजी नाईक यांची ८९ वी जयंती सुधाकरराव नाईक चौक मांडवा येथे साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सोसायटी अध्यक्ष तथा तांड्याचे नाईक वसंता आडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून कारभारी तुकाराम चव्हाण, ग्रा.पं. सदस्य गोपाल मंदाडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण इत्यादी उपस्थित होते.
या मान्यवरांच्या हस्ते जलसंधारणाचे प्रणेते सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमाचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी पांडुरंग रणखांब यांनी कै.सुधाकरराव नाईक यांच्या जीवनकार्यवर प्रकाश टाकला.
यावेळी फुलसिंग राठोड,नामदेव आडे,कैलास आबाळे, रमेश ढोले, अशोक आडे,पंडित आडे, माणिक राठोड, नारायण पवार, विजय राठोड, रंगराव आडे, कैलास राठोड, श्री संत सेवालाल महाराज जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी मंडळी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शक्ती आडे यांनी केले तर आभार बजरंग राठोड यांनी मानले.













