


✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.21ऑगस्ट):-सेवानिवृत्तीचा क्षण हा आयुष्यातील एक भावनिक अविस्मरणीय प्रसंग असतो कारण यावेळी आपण आपल्या अनेक खास लोकांपासून आणि आपल्या संपूर्ण जीवन प्रक्रियेपासून दुरावल्या जातो. परंतु आपण शासनाला दिलेल्या सेवा, व सामाजिक शेत्रात अतुलनीय,कार्याचा अमीट ठसा उमटविला शेवट गोड केला. त्यानिमित्य रंजन सामाजिक मंच व भारतीय परिवार बचाव संघटनेचे पदाधिकारी तसेच मित्र परिवारातर्फे भव्य सत्कार सोहळा घेण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष नरुले, सत्कारमूर्ती डॉ. नंदकिशोर मैंदळकर, प्रमुख पाहुणे मोहन जीवतोडे, वसंत भलमे, प्रदीप गोविंदवार, सचिन बरबटकर, गंगाधर गुरनूले, गौरव आक्केवार, नितीन चंदेकर, तुषार अक्केवार प्रशांत मडावी, स्वप्नील सूत्रपवार, विनोद करमरकर आदी उपस्थित होते. सुभाष नरुले आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले आपण आज शासकीय कार्यातून सेवानिवृत्त झाले आहात आपल्या जीवनाचा पहिला अंक समाप्त झाला परंतु जीवनाचा दुसरा अंक हा समाजसेवेचा सुरू झाला आहे. आपण आजपर्यंत परिवार बचाव संघटना व रंजन सामाजिक मंचच्या माध्यमातून जी समाजसेवा चालविली ती आता जोमाने सुरू ठेवावी.
आजपर्यंत आपल्याला वेळेची कमतरता होती परंतु आपण आता पूर्ण वेळ समाजाला अर्पण करू शकता आपल्या हातून जे सामाजिक कार्य होत आहे ते अव्याहत पणे सतत, निरंतर चालू राहावे अशी आमच्या कार्यकर्त्याकडून अपेक्षा आहे. आपल्या कार्यास आमचे संपूर्ण सहकार्य राहणार आहे. मी तुम्हाला प्रामाणिक पणें आश्वासन देतो की आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आपण मला जी साथ देत आहात त्याला मी नक्कीच उत्तरदायी राहील. संघटनेचे कार्य ध्येयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत चूप बसणार नाही याची ग्वाही देतो. तसेच मी तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो आणि आपना सर्वांच्या उज्वल भविष्यासाठी तुम्हा सर्वांना आनंद आणि यशाच्या शुभेच्छा देतो.













