✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ) मो.9823995466
उमरखेड (दि.10 ऑगस्ट) तालुयातील मौजे चिंचोली (संगम) येथे पैनगंगा व कयाधू या दोन नद्यांचा संगम असल्यामुळे येथील नद्यांना पूर येऊन चिंचोली (संगम) या गावाचा उमरखेड तालुका सोबत संपर्क तुटतोच.
चिंचोली (संगम) या गावाला चारी बाजूने पाण्याचा वेढा असते.
येथे सन 2006 मध्ये सर्व दलित वस्तीमध्ये पाणी आले होते त्यामध्ये दलित वस्तीतील नागरिकांच्या घराचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
1983 मध्ये सुद्धा असच गावामध्ये पाणी येऊन घरांचे नुकसान झाले होते.
चिंचोली (संगम) येथे नद्या मुळे व नद्याला येणाऱ्या पुरामुळे चिंचोली संगम या गावाचे पुनर्वसन करणे अत्यंत गरजेचे आह.
सदरलगाव रेड झोन मध्ये असते. त्यामुळे दलित वस्तीचे पुनर्वसन करावे…! अशा मागणीचे निवेदन यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, आणि तहसील कार्यालय उमरखेड यांना ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुमेधभाऊ नवसागरे, सामाजिक कार्यकर्ते राहुल नवसागरे, प्रशांत नवसागरे, कैलास खडसे, रवी शेळके, धोंडबा नवसागरे, गौतम नवसागरे, मोतीराम नवसागरे, सिद्धार्थ कदम, गयाबाई नवसागरे, पुण्यरथाबाई नवसागरे, रमाबाई नवसागरे, सुनीताबाई नवसागरे, सुमनबाई नवसागरे असे अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.