


✒️सिद्धार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड (दि. 16जुलै) नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाला हा उमरखेड येथून राष्ट्रीय महामार्ग क्र.61 गेला आहे. अल्पावधीतच तडे गेले आहे.यामुळे रस्ता बांधकाम कंपनीच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तसेच चुरमुरा फाट्याच्या अलीकडून ब्रिज जवळील कच्चा रोडला मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहे. उमरखेड आणि महागाव तालुक्यात बांधकाम कंपनीतर्फे सिमेंट काँक्रिटचा रस्ता तयार केला जात आहे.
काही ठिकाणी रस्ता पूर्णपणे तयार झाला. मात्र अल्पावधीतच त्याला तडे गेले आहे. यामुळे सिमेंट रस्त्याच्या गुणवत्तेबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. या रस्त्याने धावणाऱ्या वाहनधारकांसाठी हे तडे व कच्च्या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे निर्माण झाले असून भविष्यात याची अडचणीचे ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
उमरखेड ते मार्लेगाव दरम्यान या रस्त्याला अवघ्या तीन महिन्यातच तडे गेले आहे. या सिमेंट रस्त्यावर आतापर्यंत कोट्यवधींचा खर्च झाला. मात्र अल्पावधीतच तडे गेल्याने बांधकाम कंपनीचे पितळ उघडे पडले आहे.
नवनिर्मित रस्त्यावरून वाहतूक सुरू होताच रस्त्याची गुणवत्ता दिसून आली. चौपदरीकरण होवून अद्याप वर्षेही लोटले नाही.या रस्त्याची विविध विभागांनी तपासणीसुद्धा केली. गुणनियंत्रण विभागानेही तपासणी करणे गरजेचे आहे.
अन्यथा भविष्यात तड्यांच्या ठिकाणी मोठे खड्डे पडण्याची शक्यता बळावली आहे.दरम्यान महागावनजीक कंपनीने मशनरी झाकून ठेवली आहे. काही ठिकाणी काम बंद आहे. त्यामुळे हा रस्ता कधी पूर्णत्वास जाईल याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
बांधकाम कंपनीने हा रस्ता 100 वर्षे टिकण्याची हमी दिली आहे. मात्र वर्ष लोटत नाही तोच ठिकठिकाणी रस्त्याला तडे गेले आहे. त्यामुळे कंपनीच्या हमी बाबतही साशंकता निर्माण झाली आहे. वाहनधारकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण दिसत आहे.तसेच उमरखेड शहराला लागून होत असलेला चुरमुरा फाट्याच्या आलीच्या ठिकाणी बायपास च्या कच्चा रोडवर मोठमोठे खड्डे पडले असून त्यामध्ये ये – जा करणारी मोठमोठे वाहने अडकत आहेत.
त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसून रोडवर निर्माण झालेल्या खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे त्या त्या खड्ड्यांचा अंदाज वाहन चालकाला लागत नसून भविष्यात या ठिकाणी जीवघेणा अपघात होऊ शकतो.यात मात्र शंका नाही.पण उमरखेडला लागून होत असलेला बायपास रोड वरील पडलेले खड्डे त्वरित बुजविण्यात यावे अशी नागरिकांची व वाहन चालकाची मागणी जोर देत आहे.अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ दिवेकर शहराध्यक्ष भिम टायगर सेना यांनी दिली.













