


[मुव्हमेन्ट फॉर पिस अँन्ड जस्टीस चे राज्यस्तरा वर राबविणार मोहीम]
✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ) मो.9823995466
उमरखेड : – (दि. 16 जुलै) भारत सरकारद्वारे एकात्मिक बाल विकास सेवा कार्यक्रम (ICDS) अंतर्गत माता आणि मुलांमधील भूक आणि कुपोषणाची समस्या सोडवण्यासाठी प्रायोजित केलेला कार्यक्रम आहे. हे एक प्रकारचे बाल आणि माता काळजी केंद्र आहे .जेथे आरोग्य, पोषण आणि शिक्षण यासारख्या सेवा उपलब्ध आहेत.
मात्र अनेकदा लोकांना अंगणवाडीतून मिळणाऱ्या सेवांची माहिती नसते. त्यामुळे त्यांना अंगणवाडीचा लाभ मिळत नसल्याने मुव्हमेन्ट फॉर पीस अँन्ड जस्टीस फॉर वेलफेअर (एम पी जे) या जनअधिकारा वर काम करणाऱ्या सामाजिक संघटने तर्फे 15 जुलै पासून ‘सशक्त अंगणवाडी निरोगी समाज ‘हे राज्य स्तरिय जन जागृती अभियान राबविण्यात येणार आहे.
अभियाना चा उद्देश – अंगणवाडी कार्यक्रम आणि त्याचे फायदे याबद्दल जागरुकता वाढवणे आणि त्यांची सेवा घेण्यास प्रोत्साहित करणे हा असुन
लक्ष्य – महिला, किशोरवयीन मुली राहणार आहेत .यासाठी बस्ती सभा, जनसभा, कॉर्नर मीटिंग, मुलींच्या शाळा-महाविद्यालयांमध्ये व्याख्याने, अंगणवाडी सेविका अर्पणपत्रिका, पोस्टर्स, व्हॉट्सअॅप पिक्चर्स, यूट्यूब व्हिडीओज इत्यादींचे इत्यादी उपक्रमाचा भाग आहे .
सर्व भागधारकांमध्ये जागरूकता निर्माण करणे ,लोकसंख्येनुसार अंगणवाडीची मागणी करणे , MPJ च्या महिला कार्यकर्तां मध्ये वाढ करणे हा निकल अपेक्षित आहे.
अंगणवाडी कार्यक्रमाबद्दल जागरूकता वाढणे, अंगणवाड्यां मधील पटसंख्या वाढणे, पात्र अंगणवाडी सेविकांच्या संख्येत वाढ मोहिमेच्या यशाचे मूल्यमापन वरील मेट्रिक्सच्या आधारे केले जाईल अभियानाचे निष्कर्ष: अंगणवाडी आणि त्यांच्या फायद्यांबाबत जनजागृती करण्यासाठी हा महत्त्वाचा उपक्रम आहे.
लक्ष्य गटाला अंगणवाडीच्या सेवा वापरण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि महिलांमध्ये संघटने चा विस्तार हे एमपीजे च्या मोहिमेद्वारे साध्य करण्याचा प्रयत्न राहील.













