Home यवतमाळ गो. सी. गावंडे महाविद्यालयात ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा

गो. सी. गावंडे महाविद्यालयात ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा

235

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड (दि. 21जून)गो. सी. गावंडे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस पतंजली योग समिती उमरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला यानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थी प्रशासकीय कर्मचारी व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.

सर्व विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व व प्रात्यक्षिक दाखविण्यात आले व योगासनाबद्दल माहिती देण्यात आली, योग प्रशिक्षणासाठी विशेष करून राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी स्पोर्ट्स चे विद्यार्थी व एनसीसीचे विद्यार्थी उपस्थित होते, आंतरराष्ट्रीय योग दिवस हा दरवर्षी 21जून रोजी जगभरात साजरा केला जातो.

संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता दिली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत 21जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या 193
देशांपैकी 175 देशांच्या सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत.

योग प्रशिक्षणासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉ. माधवराव बी. कदम उपस्थित होते त्याचबरोबर उपप्राचार्य प्रा.प्रवीण एम.गुजर, योग तज्ञ डॉ. बी. एम. सावरकर , डॉ. पी.वाय.अनासाने, प्रा.एस.एस. पाचकुडके, एन.सी.सी.सिनियर अभय काळे, आणि अंजली इरेवर यांनी कार्यक्रसाठी मोलाचे योगदान दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here