


✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466
उमरखेड (दि.18जून) तालुका शेतकरी सहकारी जिनींग अँड प्रेसींग सोसायटीच्या अत्यंत चुरशीच्या अश्या निवडनुकीसाठी आज मतदान पार पडले. आणि
कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीमध्ये प्रचाराचा चांगलाच धुरळा उडाला होता.
ही निवडणूक फार अटीटतीची झाली असून कोण मारणार बाजी…!.
याकडे सर्व तालुक्याचे नव्हे तर जिल्ह्याचे सुद्धा लक्ष लागले आहे.
विजयराव माने यांची तुरटी खरच या संस्थे मधला गढूळ पणा साफ करेल का? की राम देवसरकर यांचा स्वच्छ कारभार पुन्हा एकदा पाहायला मिळेल.
अशी अपेक्षा महविकास आघाडीचे नेते व्यक्त करत आहेत.
विजयाच्या आदीच माजी आमदार विजयराव खडसे यांनी आणलेला पेढा नक्की कोण? खाणार…! तसेच भाजप च सहकार क्षेत्रामध्ये वजन वाढेल का? अश्या अनेक प्रश्नाची उत्तरे उद्या निकाल जाहीर झाल्यावर मिळतील.
या निवडणुकीमध्ये सरासरी 82%एवढं मतदान झालं असून याचा निकाल उद्या येणार आहे.













