Home यवतमाळ हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या वसंत उद्यानाची दुरावस्था 18 ऑगस्टपूर्वी...

हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या वसंत उद्यानाची दुरावस्था 18 ऑगस्टपूर्वी उद्यानाचे सौंदर्यकरण करा,वंचित बहुजन आघाडीचा थेट इशारा

191

 

पुसद तालुका प्रतिनिधी-बाळासाहेब ढोले

पुसद /पुसद ते कळमनुरी रोडवर असलेल्या काकडदाती परिसरातील वसंत उद्यान येथे कै. वसंतराव नाईक यांचा पूर्णकृती पुतळा असून या ठिकाणी सुसज्ज अश्या उद्यानाची निर्मिती करण्यात आली होती परंतु त्याच वसंत उद्यानाची आज दूरअवस्था झाली असून हे उद्यान,काटेरी कुंपण गवताच्या कचऱ्यामध्ये ओसाड पडले आहे,

सविस्तर असे की हरितक्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक
यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उदघाट्न देशाचे तत्कालीन माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते करण्यात आले होते.
त्यामुळे पुसद नगरीच्या सौंदर्यात
उद्यानाच्या निर्मितीमुळे भर पडली होती परंतु आज रोजी मात्र तेच उद्यान, काटेरी, कुंपण, गवत व दारू, बियर,च्या बाटल्याच्या
ढिगार्‍यात ओसाड पडलेले
दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा वसंत उद्यान पुतळा परिसर एक प्रकारे विटंबना झाल्याने अपमानित होत आहे.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी
दि.18 ऑगस्ट 2023 रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा स्मृतिदिन
महाराष्ट्र सरकारच्या वतीने मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो
परंतु त्यांची कर्मभूमी असलेल्या
या पुष्पावंती पुसद नगरीतील हे वसंत उद्यान मात्र ओसाड पडले आहे वसंतराव नाईक यांच्या स्मुर्ती स्थळांचा पर्यटन स्थळ म्हणून विकास व्हावा या दृष्टीकोनातून महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कार्यकाळात लाखो करोडो रुपयाचा निधी, मंजूर करण्यात आला असून त्या मंजुरात निधीचे लाखो रुपये खर्च ही करण्यात येऊन ऑडिटोरियम, सभागृह,अस्या अनेक प्रकारच्या इमारती बनून जागीच ओसाड पडलेल्या व् त्या भग्न अवस्थेत आहेत.

या इमारतीमध्ये काचांचा खच पडलेला असून, पुतळा परिसर व सर्व इमारतीच्या आजूबाजूला दारू व बियर च्या बाटल्या, सर्व परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे या उद्यानाचा वापर व्यसनाधीन दारुडे आंबट शौकीन तरुण-तरुणी चुकीचा वापर या स्थळांचा करित आहेत
हरितक्रांतीचे प्रणेते यांचा एक प्रकारे अपमान होत असून हा अपमान वंचित बहुजन आघाडी पक्ष कदापि सहन करणार नाही
याकरिता पक्षाच्या वतीने
संबंधित विभागास सूचना वजा इशारा म्हणून येणाऱ्या 18 ऑगस्ट 2023 पूर्वी या उद्यानाची डागडुजी व सौंदर्यकरण करण्यात यावे या विषयाचे निवेदन
पुसद उपविभागीय अधिकारी तथा संबंधित अधिकारी यांना देण्यात आले आहे.

1 ऑगस्टपर्यंत या उद्यानाची डागडुजी व सौंदर्य करणन न झाल्यास वंचित बहुजन आघाडी पक्षाच्यावतीने येथील चौकात उग्र रास्ता रोको आंदोलन व उद्यानाची डागडुजी व सौंदर्यीकरण करण्यात येईल,
असेही शेवटी निवेदनात म्हटले आहे.
यावेळी प्रामुख्याने उपस्थितवंचित बहुजन आघाडीचे पुसद तालुका अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव, पुसद शहराध्यक्ष जयानंद उबाळे, जिल्हा उपाध्यक्ष शामराव राठोड,राजरत्न लोखंडे,डॉ. अरुण राऊत,कृष्णा दोडके, राहुल धुळे, शुभम खंदारे, सिद्धार्थ बर्डे, वैभव सूर्यवंशी,विशाल टाळीकोटे,संदीप मनवर तथा वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ता पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here