Home महाराष्ट्र ब्रम्हपूरी पोलीसांकडून जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

ब्रम्हपूरी पोलीसांकडून जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

148

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि. 8 मार्च):-पोलीस स्टेशन ब्रम्हपूरीमध्ये 8 मार्च जागतिक महीला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पोलीस ठाण्यातील कार्यरत महीला अधिकारी व अमलदार यांना पूर्ण दिवस संपूर्ण पोलीस ठाण्याची जबाबदारी देउन त्यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देउन सत्कार करण्यात आला.

दरवर्षी 8 मार्च रोजी संपूर्ण जगात महीलांच्या सन्मानार्थ जागतिक महीला दिन साजरा करण्यात येतो. त्यानिमीत्ताने पोलीस स्टेशन ब्रम्हपूरीचे ठाणेदार सुधाकर आंभोरे यांनी पोलीस ठाण्यातील कार्यरत सर्व महीला अधिकारी व अमलदार यांचे पूष्पगुच्छ व भेटवस्तू देउन शुभेच्छापूर्ण सत्कार केले. महीला पोलीस उपनिरीक्षक स्वाती फुलेकर यांना पूर्ण पोलीस स्टेशनचा चार्ज देण्यात आला.

तसेच इतर कार्यरत महीला पोलीस अंमलदार नापो / शुभांगिनी शेमले, लतिका मिसार, मनिषा कुत्तरमारे, भाविका लाडे, पोशी/प्रभा नेटी, शिल्पा काटकर, पुजा राउत, नंदा तांडेकर, किर्ती बगमारे यांना ठाण्यातील डयुटी ऑफिसर, स्टेशन डायरी अंमलदार अशा नियमित कर्तव्याचे चार्ज देण्यात आले. आज संपूर्ण दिवस पोलीस ठाण्याची जबाबदारी सर्व महीलांना देण्यात येउन त्यांचा सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमात पोस्टेचे सर्व पोलीस अधिकारी व अमंलदार उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here