Home चंद्रपूर बँक ऑफ इंडिया स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था बाबूपेठ येथे महिला दिन थाटात...

बँक ऑफ इंडिया स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था बाबूपेठ येथे महिला दिन थाटात साजरा

291

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.9मार्च):- जागतिक महिला दिनानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिथे विविध क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या महिलांचा सत्कार देखील करण्यात आला. याच महिला दिनानिमित्त बँक ऑफ इंडिया स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था बाबूपेठ चंद्रपूर येथे महिला दिन हर्षोल्लासाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून प्रशांत धोगले एलडीएम चंद्रपूर, पर्यावरण संवर्धन व विकास समिती चंद्रपूर जिल्हा महिला अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टी चंद्रपूर शहर माजी उपाध्यक्ष स्वातीताई दुर्गमवार यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. सोबतच स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे डायरेक्टर प्रफुल अल्लुरवार, अनुप कासवटे, अक्षय लांजेकर, मीनल लांजेकर मॅडम या उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात आद्य शिक्षिका क्रांतिवीर माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलनाने झाली .यानंतर मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन RCET च्या विद्यार्थिनींनी स्वागत केले .मान्यवरांनी उपस्थित सर्व RCET च्या महिला प्रशिक्षणार्थींना मोलाचे मार्गदर्शन करून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांतर्गत विद्यार्थिनींनी नृत्य व गीत सादर केले. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here