


✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.27फेब्रुवारी):–स्थानिक राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर येथे मराठी विभागातर्फे मराठी गौरव दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठी विभाग प्रमुख प्रा. कार्तिक पाटील होतें. त्यानी आपल्या भाषणात मराठी भाषा संवर्धन करणे आवश्यक आहे. ज्ञानेश्वर महाराज यांच्या पासुन ते आजतागायत मराठी भाषा कशी विकसित झाली. व मराठी भाषा प्रमाण भाषा असावी या साठी सकारात्मक प्रयत्न हवे.
तसेच कुसुमाग्रज यांच्या साहित्यीक सामाजिक कार्यकर्तुत्वाचा समग्र धांडोळा घेतला. प्रमुख वक्ते प्रा.प्रफुल राजुरवाडे होते. त्यानी आपल्या मार्गदर्शनात मराठी भाषेचा समग्र इतिहास कथन केला.
सातवहानापासून ते जगाच्या इतिहासातील आजतागायत आपले अस्तित्व मराठी भाषा कशी तग धरून राहिली यासंदर्भात मराठी भाषेचा इतिहास सांगितला. प्रा पितांबर पिसे यांनी मराठी भाषा जतन व संरक्षण करण्यासाठी तरुण पिढीने पुढे आले पाहिजे. त्यासाठी आवश्यक प्रयत्न हवा. महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ प्रफुल्ल बन्सोड यांनी आपल्या प्रास्ताविकातून मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी कुसुमाग्रजांनी परिश्रम घेतले. मराठी बोलीला उचांवर नेण्याचे कार्य केले. मराठी साहित्याची जागतिक पातळीवरील महत्ता त्यांनी विशद केली. या कार्यक्रमास वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. गजभिये, रासेयोचे डॉ. नितिन कत्रोजवार विद्यार्थी विकास विभागाचे डॉ. राहांगडाले, डॉ. कामडी, प्रा. पोपटे, प्रा वर्षा सोनटक्के, प्रा वाकडे उपास्थित होते. या कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.













