


✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आड)मो:-9075913114
गेवराई(दि.27फेब्रुवारी):- तालुक्यातील गढी जवळ स्कार्पिओचा आणि उसाने भरून जात असलेल्या ट्रॅक्टरचा अपघात रविवारी सायंकाळी ५ च्या सुमारास झाला आहे. यामध्ये दोघेजण जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
भरधाव वेगात आलेली स्कार्पिओ तसेच ऊसाने भरलेला ट्रॅक्टर आणि एक ट्रक असे तीन वाहनांचा ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे. स्कार्पिओ क्रमांक MH.16 AT.2451 ही असून ऊस घेऊन चालेला ट्रॅक्टर आणि ट्रक ओव्हरटेक करण्याच्या नादात स्कार्पिओ ऊसाने भरून चाललेल्या ट्रॅक्टरच्या मागील ट्राॅलीला जाऊन धडकली यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे













