Home महाराष्ट्र वेणूताई चव्हाण कॉलेजमध्ये शिवराज्याभिषेक दिन उत्साहात 

वेणूताई चव्हाण कॉलेजमध्ये शिवराज्याभिषेक दिन उत्साहात 

121

✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

 कराड(दि.7जून):-येथील वेणूताई चव्हाण कॉलेजमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करून हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्यकर्तृत्व, नेतृत्व, पराक्रम, युद्धनीती,प्रशासन,स्वराज्याची स्थापना आणि राष्ट्रभक्ती याबाबत जनजागृती निर्माण करणे होता.तसेच नव्या पिढीसमोर आदर्श निर्माण व्हावा .

        या कार्यक्रमाची सुरुवात शिवतीर्थ,दत्त चौक, कराड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादनाने झाली यानंतर श्री. शिवाजी शिक्षण संस्था उच्च शिक्षण मंडळ कराडचे जनरल सेक्रेटरी मा. श्री. अल्ताफहुसेन नसिरुद्दीन मुल्ला व विश्वस्त, सदस्य मा. श्री अरुण पाटील (काका )यांच्या शुभहस्ते शिवज्योत प्रज्वलित करण्यात आली.

याप्रसंगी वेणूताई चव्हाण कॉलेजचे प्राचार्य प्रो. डॉ. आर. आर. जाधव, यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्सचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. एच.बुरुंगले, उपप्राचार्य एस. एल. महामुनी, उपप्राचार्य श्री आर. ए. कांबळे, डॉ. महेंद्र कदम पाटील, डॉ. एन. ए. पाटील, प्रा. एस. एस. बोंगाळे, प्रा. ए. ए. गायकवाड तसेच प्राध्यापक, विध्यार्थी व प्रशासकीय सेवक बहुसंख्येने उपस्थित होते.या ज्योतीचे महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर ही ज्योत महाविद्यालयात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ नेण्यात आली. या ठिकाणी सर्वांनी अभिवादन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here