


▪️राजमाता होळकर यांची ३०१ जयंती उत्साहात साजरी
✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)
भंडारा(दि.6जून):- सामान्य कुटुंबात जन्म घेऊन आपल्या अद्वितीय कर्तृत्वाच्या बळावर अहिल्यादेवी होळकर लोकमाता बनल्या. राबविलेल्या योजना, महिलांच्या सक्षमीकरणासाठी केलेले प्रयत्न तसेच धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात दिलेले योगदान आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. अहिल्यादेवी होळकर यांनी जनतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत सुशासनाचा आदर्श निर्माण केला. कही हम भूल ना जाये या इंदोर परिसरात मल्हारराव होळकर परिवाराचे राज्य होते. त्यांचे सुपुत्र खंडेराव हे लढाईत मारले गेल्यावर त्यांची पत्नी अहिल्याबाई यांनी तो राज्यकारभार सांभाळला व सतत ३० वर्षे राज्य केले अशा या शौर्यशाली राजमाते पासून बहुजन समाजाने प्रेरणा घ्यावी. त्यांच्या कार्यातून सामाजिक समता, लोकसेवा आणि कर्तव्यनिष्ठ नेतृत्वाचे मूल्य अधोरेखित होते. आजच्या पिढीने त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजहितासाठी कार्य करावे असे प्रतिपादन जे. एम. पटेल महाविद्यालयाचे प्रा. अजय देवकाते यांनी केले.
ते धनगर अधिकारी- कर्मचारी संघटना जिल्हा शाखा भंडारा / गोंदिया व सकल धनगर समाज बांधव यांच्या संयुक्त विदयमानाने अश्विनी कॉन्व्हेन्ट खात रोड भंडारा येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्सवाचा कार्यक्रम साजरा करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस. एन. मोर. महाविद्यालयाचे प्रा. अमोल खांदेवे होते. प्रमुख पाहुणे जे. एम. पटेल महाविद्यालयाचे प्रा. अजय देवकाते, अश्विनी कॉन्व्हेन्टचे संस्थापक ज्ञानेश्वर रोकडे, ओम सत्यसाई बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुभाष वाडिभष्मे, जिल्हा परिषद सदस्य नंदा झंझाळ, भारतीय आट्यापाट्या संघाची कर्णधार प्राची चटप, सरपंच सौ. वैशाली सार्वे, मुख्याध्यापिका सौ सुष्मा वंजारी, पतंजलि योग समिती खोकरलाचे अध्यक्ष यशवंत बिरे, ग्रामपंचायत सदस्य पंकज उके, नितू ढोबळे, सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, धनगर अधिकारी- कर्मचारी संघटना जिल्हा शाखा भंडारा / गोंदियाचे अध्यक्ष सुरेश घोडे, सामाजीक कार्यकर्त्या इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले.
त्यावेळी कार्यक्रमात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करत सेवानिवृत्त कर्मचारी व भारतीय आट्यापाट्या संघाची कर्णधार तथा सुवर्णपदक विजेती कु.प्राची चटप यांचा शाल श्रीफळ व स्मरणिका, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच सामान्य कुटुंबात जन्म घेऊन आपल्या अद्वितीय कर्तृत्वाच्या बळावर अहल्यादेवी लोकमाता बनल्या. सामाजिक समरसता, महिला सक्षमीकरण, शेतकरी हित, जलसंवर्धन आणि सांस्कृतिक वारसा जतन यासाठी त्यांनी केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे. असे मत ओम सत्यसाई बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुभाष वाडिभस्मे यांनी केले. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या दूरदृष्टी, न्यायनिष्ठा आणि लोकाभिमुख प्रशासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण बळावर एक आदर्श राज्यव्यवस्थेवर कार्य केले आहे असे मत अश्विनी कॉन्व्हेन्टचे संस्थापक ज्ञानेश्वर रोकडे यांनी व्यक्त केले. तसेच निधी व जिया पडोळे तसेच मान्यवरांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरीत्र्यांवर विविध मार्मिक उदाहरण देऊन मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनगर अधिकारी- कर्मचारी संघटना जिल्हा शाखा भंडारा / गोंदियाचे उपाध्यक्ष श्री दादाराव लुचे व प्रास्ताविक धनगर अधिकारी- कर्मचारी संघटना जिल्हा शाखा भंडारा / गोंदियाचे अध्यक्ष सुरेश घोडे, यांनी केले तर उपस्थितांचे आभार मनोहर अहिर यांनी मानले.















