


✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)8698566515
गंगाखेड(दि.5जून):-पालम तालुक्यातील मुदत संपल्यावर नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकासाठी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि 03.04.2026 रोजी तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्य पदांच्या प्रभागनिहाय आरक्षण निश्चिती, आरक्षण चक्रानुक्रमे फिरविणे व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
तालुक्यांतील मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे कार्यक्रमानुसार दिनांक 09जून २०२६ ते दिनांक 12.जून 2026 रोजी विशेष ग्रामसभेमध्ये आरक्षण सोडत काढण्यात येईल. त्यानंतर प्राप्त झालेल्या आरक्षण प्रस्तावाचे प्रकाशन करण्यात येणार असून नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात येतील.
प्राप्त हरकतींचा विचार करून उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी स्तरावर अंतिम मंजुरीची कार्यवाही करण्यात येणार आहे.सर्व संबंधित ग्रामपंचायतींनी नियोजित तारखेनुसार विशेष ग्रामसभा आयोजित करावी तसेच आरक्षण सोडतीची कार्यवाही शासनाच्या व राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पारदर्शक पद्धतीने पूर्ण करावी, असे आवाहन तहसील प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.तसेच ग्रामस्थांनी ग्रामसभेस उपस्थित राहून आरक्षण सोडत प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन तहसीलदार कैलास चंद्र वाघमारे यांनी केले आहे.















