Home महाराष्ट्र मा. जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे संशयास्पद कर्मचारी नियुक्त्यांप्रकरणी निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर...

मा. जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे संशयास्पद कर्मचारी नियुक्त्यांप्रकरणी निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कार्यवाही केली मागणी

68

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.22मे):-परभणी जिल्हातील गंगाखेड येथील गंगाखेड नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा, विषयपत्रिका व विकासकामांबाबतची वस्तुस्थिती तसेच सन २०२४-२५ व २०२५-२६ मधील ३४ संशयास्पद कर्मचारी नियुक्त्यांप्रकरणी आज मा. जिल्हाधिकारी महोदयांची भेट घेऊन मा. आ. डॉ. मधुसूदनजी केंद्रे साहेब व राष्ट्रवादी पार्टीचे गट नेते ॲड. मिथिलेश भैय्या केंद्रे यांनी सविस्तर निवेदन सादर करून,.

नगरपरिषदेबाबत काही जणांकडून जाणीवपूर्वक चुकीची व दिशाभूल करणारी माहिती दिली जात असल्याचे निदर्शनास आणून देत, शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, दिवाबत्ती, स्वच्छता यांसारख्या मूलभूत विकासकामांना राजकारणाच्या आड येऊ न देण्याची ठाम भूमिका मांडण्यात आली.

तसेच नियमबाह्य पद्धतीने झालेल्या ३४ संशयास्पद कर्मचारी नियुक्त्यांची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.

गंगाखेड शहराच्या विकासाच्या आड येणाऱ्या कोणत्याही चुकीच्या प्रवृत्तीसमोर झुकणार नाही, तर जनहितासाठी आमची लढाई पुढेही अधिक ताकदीने सुरु राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here