Home चंद्रपूर इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

315

▪️आदर्श हायस्कूल ची उज्वल यशाची परंपरा कायम.

✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428

राजुरा(दि.१६मे):-बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित आदर्श हायस्कूल राजुरा येथील इयत्ता दहावीच्या निकालाची उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत यंदाही उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेचा एकूण निकाल ८९.६० टक्के लागला असून ९७ परीक्षार्थ्यां पैकी ८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

यामध्ये यश रोहिदास कुळमेथे यांनी ९४.४० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. तर द्वितीय क्रमांक सुहाना पहानपटे ८९ टक्के, तृतीय क्रमांक संकेत मोहितकर ८८ टक्के तसेच प्राविण्य श्रेणीत २०, प्रथम श्रेणीत ४०, द्वितीय श्रेणीत १६ आणि तृतीय श्रेणीत ७ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

या यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष सतीश धोटे, उपाध्यक्ष मनोहर साबनानी, सचिव भास्करराव येसेकर, मुख्याध्यापक सारिपुत्र जांभुळकर, वर्गशिक्षक नवनाथ बुटले, पर्यवेक्षक तथा राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले, शिक्षक विकास बावणे आदींनी यश रोहिदास कुळमेथे (रा. बामणवाडा) तसेच संकेत गणपत मोहितकर (रा. सास्ती) यांच्या घरी भेट देऊन त्यांचा गुणगौरव केला.

यावेळी विद्यार्थ्यांचे आई-वडील व कुटुंबीय उपस्थित होते. बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक तथा माजी आमदार ॲड. संजय धोटे, कोषाध्यक्ष प्रकाश बेजंकीवार, सह सचिव शंकरराव काकडे, संचालक मधुकरराव जानवे, अविनाश निवलकर, मंगला माकोडे, अल्का सदावर्ते, मोहन धोटे, मारोतराव येरणे, गोविंद साबणानी, आदर्श प्राथमिकच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे तसेच सर्व शिक्षक-शिक्षिकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here