Home महाराष्ट्र पुस्तके ज्ञानाची अमूल्य संपत्ती आहे-प्रा.डॉ.उल्हास राठोड 

पुस्तके ज्ञानाची अमूल्य संपत्ती आहे-प्रा.डॉ.उल्हास राठोड 

26

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

आपण वाचलेले ज्ञान इतरांपर्यत पोहोचावे अधिकाधिक विद्यार्थ्यांना आणि वाचकांना त्याचा उपयोग व्हावा या भावनेतून मी व माझ्या सहकारी मडळीने आपल्या मांडवा गावातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयास पुस्तके भेट देताना खूप आनंद व समाधान वाटत आहे.कारण की पुस्तके ही ज्ञानाची अमूल्य अशी संपत्ती आहे असे मत प्रा. डॉ.उल्हास राठोड यांनी डॉक्टर बाबासाहेब आबेडकर सार्वजनिक वाचनालयास पुस्तके भेट देताना व्यक्त केले.

२६ जानेवारी रोजी २०२६ लोकसहभागातून वाचनालयाची निर्मिती करण्यात आली असून यामध्ये अनेक देणगीदात्यांनी स्पर्धा परिक्षेच्या पुस्तकासह विविध महागडी पुस्तके भेट दिलीत.यामध्ये नारायणराव काळे स्मृती मॉडेल कॉलेज कारंजा (घा)जि. वर्धा येथील प्रा. डॉ. उल्हास राठोड ३५ पुस्तके, प्रा. डॉ.गणेश मोहोड१८, प्रा. डॉ.महेंद्र गावंडे १५, प्रा. डॉ. सुनिल पखाले १० पुस्तके तर शिष्यवृत्तीचे वर्ग ७ वा तर वर्ग ४वा प्रत्येकी २ पुस्तके व जवाहर नवोदयचे १ असे विविध पुस्तके भेट दिली.

यावेळी राधेश्यामजी जांगिड अध्यक्ष आयुर्वेदिक महाविद्यालय पुसद, प्रा. डॉ. उल्हास राठोड, राघोजी ढोले, नथ्थुजी ढोले, वसंता वाघमारे, प्रभाकर ढोले, बाळासाहेब ढोले, संदीप ढोले, आकाश चौरे, सविधान ढोले,समाधान वाघमारे,आदी गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here