Home चंद्रपूर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत जमीन खरेदीबाबतचे प्रस्ताव सादर करा

दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत जमीन खरेदीबाबतचे प्रस्ताव सादर करा

33

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.5मे):- कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या दारिद्र रेषेखालील भूमिहीन कुटुंबाना कायमचे उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे, तसेच त्यांच्या राहणीमानात बदल व्हावा, म्हणून कसण्याकरिता चार एकर जिरायती किंवा दोन एकर बागायती जमीन खरेदी करून द्यावयाची आहे.

जिल्ह्यातील गैर आदिवासी कुटुंबाकडून शेतजमीन खरेदी करावयाची असल्याने विक्रीस इच्छुक शेतकऱ्यांकडून सन 2025-26 करिता अर्ज मागविण्यात येत आहे. जिरायत जमीन चार एकर व बागायती जमीन दोन एकर विक्री करण्यास तयार असल्यास सम्मती पत्रासह पटवारी साझानिहाय अर्ज सादर करावेत. जमिनीचे दर हे प्रचलित शासकीय दरानुसार निश्चित करण्यात येतील किंवा वाटाघाटी करून जिल्हास्तरीय समितीद्वारे मुल्य निश्चित करण्यात येईल.

*आवश्यक कागदपत्रे :* अर्जासोबत जमिनीचा 7/12, गाव नमुना आठ, परिसरातील प्राथमिक सहकारी कृषी पतपुरवठा सेवा सोसायटीची कुठल्याही प्रकारची थकबाकी किंवा कर्ज बोजा नसल्याचे ना-हरकत प्रमाणपत्र, अर्जदाराचे कुटुंबातील सख्खे भाऊ, पत्नी, मुले यांचे जमीन विकण्यासंबंधी ना-हरकत व सम्मती प्रमाणपत्र, विक्रीच्या शेतजमिनीचे क्षेत्रफळ बरोबर असल्याची मोजणी विभागाचे टाचण व नकाशासह अहवाल, जमिनीच्या खरेदी प्रक्रियेमुळे कोणतीही नुकसान भरपाई मागणार नसल्याबाबत तसेच जमीनबाबत कोणत्याही न्यायालयामध्ये वाद सुरू नसल्याबाबतचे संबंधित शेतजमीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्याचे 100 रुपये स्टॅप पेपर वर शपथपत्र व हमीपत्र जोडण्यात यावे.

सदर प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, चंद्रपूर या कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेमध्ये पाठविण्यात यावे किंवा प्रत्यक्ष 31 मे 2026 पर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here