


✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चंद्रपूर(दि.27एप्रिल):- स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयाच्या संगणक अध्ययन व संशोधन विभागाने आयआयटी स्पोकन ट्युटोरिअल, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली ‘ऑनलाईन परीक्षा २०२६’ यशस्वीरीत्या संपन्न झाली. दिनांक ०८ ते १८ एप्रिल २०२६ या कालावधीत झालेल्या या परीक्षेत महाविद्यालयातील ७०४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. ७०४ पैकी ६११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परीक्षेत सरासरी ८६.७८ टक्के निकाल लागला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणपत्र मिळवण्याची संधी प्राप्त झाली आहे.
महाविद्यालयातील बीसीए, बीसीसीए, बी.एस्सी. (आयटी), बी.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स), एम. एस्सी. संगणक शास्त्र, एम. सी. एम. आणि एम. सी. ए. या अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. आयआयटी स्पोकन ट्युटोरिअल, मुंबईच्या तज्ञ मार्गदर्शक विद्या कदम मॅडम यांच्या देखरेखीखाली संपूर्ण परीक्षा प्रक्रिया पार पडली. यामध्ये विद्यार्थ्यांना C, C++, HTML, Java, JavaScript, Python, RDBMS, Introduction to Computer, Python for Automation, Python for Machine Learning, Android App Development using Kotlin आणि LibreOffice Suite Impress 6.3 यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर त्यांचे ज्ञान सिद्ध करण्याची संधी मिळाली.
या महत्त्वपूर्ण उपक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. एस. बी. किशोर यांनी तर आयोजक म्हणून पदवी विभागाचे डॉ. संदीप गुडेलीवार व पदव्युत्तर विभागाचे सहा. प्राध्यापक संतोष शिंदे यांनी मोलाची भूमिका बजावली.
परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी संगणक अध्ययन व संशोधन विभागातील डॉ. दयानंद हिरेमठ, सहा. प्रा. लिना नासरे, सहा. प्रा. नासिर शेख, सहा. प्रा. गितेश बुरांडे, सहा. प्रा. निगार पठाण, सहा. प्रा. निशांत शास्त्रकार, सहा. प्रा. डॉ. भारती दिखित, सहा. प्रा. शीतल बोरा, सहा. प्रा. विजयालक्ष्मी पारीक, सहा. प्रा. शायदा अली, सहा. प्रा. शारदा सत्रे, सहा. प्रा. सिमरन निषाद, सहा. प्रा. गोल्डी थडवानी, सहा. प्रा. प्रीती सोनटक्के, सहा. प्रा. जयश्री खनके, सहा. प्रा.धनश्री वानोडे, सहा. प्रा. नंदिनी लोखंडे आणि सहा. प्रा. मालिक शेख यांनी विद्यार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन व सहाय्य केले.
या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ राष्ट्रीय पातळीवरील प्रमाणपत्रच मिळाले नाही, तर त्यांच्या संगणक क्षेत्रातील ज्ञानात भर पडली असून रोजगाराभिमुख कौशल्यांचा विकास होण्यासही मदत झाली आहे. आयआयटी, मुंबई सारख्या प्रतिष्ठित संस्थेशी संलग्नित प्रमाणपत्र मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यातील करिअरसाठी एक नवी दिशा मिळाली आहे, अशा भावना व्यक्त होत आहेत.
सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री. अरविंद पोरेड्डीवार, कार्यकारी अध्यक्ष मा. आमदार श्री किशोर जोरगेवार , उपाध्यक्ष श्री. सुदर्शन निमकर, सौ. सगुणाताई तलांडी मॅडम, उपाध्यक्ष, श्री. प्रशांत पोटदुखे, सचिव, डॉ. कीर्ती वर्धन दीक्षित, सहसचिव, श्री. संदीप गड्डमवार, कोषाध्यक्ष, श्री. राकेशजी पटेल, सदस्य, श्री. एस. रमजान, श्री. चंद्रशेखर वाडेगावकर, श्री. सुरेश पोटदुखे, श्री. जिनेश पटेल यांनी उपरोक्त आयोजनाबद्दल शुभेच्छा दिल्या.














