Home महाराष्ट्र बॉम्बे अडल्ट एज्युकेशन असोसिएशनच्या सरचिटणीसपदी राजन चाचड यांची नियुक्ती

बॉम्बे अडल्ट एज्युकेशन असोसिएशनच्या सरचिटणीसपदी राजन चाचड यांची नियुक्ती

62

✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७

मुंबई(दि.26एप्रिल):-फोर्ट, मुंबई येथील बॉम्बे अडल्ट एज्युकेशन असोसिएशन (BAEA) या ९२ वर्षांहून अधिक परंपरा असलेल्या प्रतिष्ठित संस्थेच्या सरचिटणीसपदी श्री. राजन चाचड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सन १९३६ मध्ये (नोंदणी क्र. F-153 BOM) ब्रिटिश काळात स्थापन झालेली ही संस्था प्रौढ शिक्षण व कौशल्य विकास क्षेत्रात अग्रणी राहिली आहे. गेल्या अनेक दशकांपासून या संस्थेने जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश व मराठी अशा विविध परदेशी व भारतीय भाषांचे दर्जेदार अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले असून, उत्कृष्ट अध्यापन व विद्यार्थी-केंद्रित वातावरणामुळे संस्थेला विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.

संस्थेचे मुख्यालय काळा घोडा, फोर्ट, मुंबई येथील के. आर. कामा हॉल या वारसाहक्काच्या इमारतीत स्थित आहे. तसेच, भायखळा येथील जेरबाई बाग येथे दोन मजली ग्रंथालय व वाचनालय कार्यरत असून, येथे २०व्या शतकापासूनचे विविध पुस्तके, कादंबऱ्या व संशोधनपर साहित्याचा समृद्ध संग्रह उपलब्ध आहे.

नवीन नेतृत्वाखाली संस्थेच्या शैक्षणिक उपक्रमांचा विस्तार करण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्याअंतर्गत लवकरच मराठी संभाषण (स्पोकन) भाषा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.

प्रवेश व अधिक माहितीसाठी इच्छुकांनी संपर्क साधावा : ९८९२७३५६२२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here