Home महाराष्ट्र गंगाखेडमध्ये “शास्त्रीय संगीत महोत्सवाचे” आयोजन

गंगाखेडमध्ये “शास्त्रीय संगीत महोत्सवाचे” आयोजन

79

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.21मार्च):-शहरातील संगीत रसिकांसाठी आनंदाची बातमी असून, “चैत्र पालवी” निमित्त दि. २२ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता मोरया फंक्शन हॉल, डॉक्टर लेन येथे प्रथमच भव्य “शास्त्रीय संगीत महोत्सव” आयोजित करण्यात आला आहे.

या महोत्सवात गंगाखेड येथील नादब्रह्म संगीत महाविद्यालयाचे संचालक प्रा. डॉ. सचिन पवार यांच्या शिष्यवृंदांकडून विविध रागांतील बंदिशी, नाट्यगीते, ठूमरी, दादरा, भक्तिगीते, अभंग तसेच रागाधारित भावगीते सादर केली जाणार आहेत. यासोबतच सामूहिक तबलावादन, बासरी वादन, तबला सोलो वादन आणि ढोलकी वादनाचीही विशेष मैफल रंगणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन श्री केदारेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, उखळी बु. (ता. सोनपेठ) संचलित नादब्रह्म संगीत महाविद्यालय, गंगाखेड यांच्या वतीने करण्यात आले असून, प्रा. डॉ. सचिन पवार व त्यांच्या शिष्य परिवाराने या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत.

गंगाखेड शहरासह परिसरातील सर्व संगीत प्रेमी व नागरिकांनी या संगीतमय पर्वाचा आनंद घेण्यासाठी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here