Home महाराष्ट्र खटाव पंचायत समितीवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व

खटाव पंचायत समितीवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व

118

✒️खटाव प्रतिनिधी(नितीन राजे)मो:-9822800812

खटाव(दि.17मार्च):-गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षांची पकड असलेल्या खटाव पंचायत समितीवर भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत सभापतिपदी कातरखटाव गणाच्या पंचायत समिती सदस्या वनिता दुबळे यांची बिनविरोध निवड केली. तर उपसभापती पदासाठी हात वर करून घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत भाजपच्या डिस्कळ गणातील सदस्या रेश्मा शेडगे यांना ८ मते मिळाल्याने त्यांची उपसभापती निवड करण्यात आली.

खटाव पंचायत समितीचे सभापती पद मागासवर्गीय महिला या जागेसाठी राखीव असल्याने कातरखटाव गणातून भाजपच्या तिकीटावर निवडून आलेल्या सौ. वनिता सोपान दुबळे यांची

सभापतीपदी वर्णी लागली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उपसभापती पदासाठी पुसेसावळी गणाचे नवनिर्वाचित सदस्य संग्राम चंद्रकांत कदम व भाजपाच्या वतीने डिस्कळ गणातील नवनिर्वाचित सदस्या रेश्मा शिवाजी शेडगे यांनी अर्ज दाखल केले होते. उपसभापती पदासाठी दोन अर्ज दाखल झाल्याने हात वर करून अवाजवी मतदान घेण्यात आले. यामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार कदम यांना एकूण ६ मते मिळाली, तर भाजपाच्या उमेदवार शेडगे यांना एकूण ८ मते मिळाली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी शेडगे यांची उपसभापती निवड घोषित केली.

निवडी दरम्यान पिठासन अधिकारी म्हणून माण-खटावच्या उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर, खटाव तालुका तहसीलदार बाई माने, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तथा सचिव योगेश कदम यांनी काम पाहिले.

सभापती वनिता दुबळे, उपसभापती रेश्मा शेडगे यांच्या सत्काराप्रसंगी ना. जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनिया गोरे, आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे, जिल्हा परिषद सदस्य धनंजय चव्हाण, मायणी जिल्हा परिषद गटाचे सुरज पाटील, सोमनाथ भोसले, विशाल बागल, भाजपचे जिल्हा सरचिटणीस विकल्प शहा, भाजपचे खटाव तालुका अध्यक्ष अनिल माळी तसेच वडूजच्या नगराध्यक्षा स्वप्नाली गोडसे, सी. एम. पाटील, विक्रमसिंह कदम, जितेंद्र पवार, भाजपचे खटाव तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष अक्षय थोरवे, डॉ. विवेक देशमुख, भरत जाधव, शशिकांत मोरे, सोमनाथ बुधे, सचिन माळी, महेश खडके, संतोष दुबळे, धनाजी दुबळे, आदींसह पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य, सर्व गणातील कार्यकर्ते व मान्यवर मंडळी यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here