Home चंद्रपूर जागतिक महिला दिनानिमित्ताने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्ताने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार

133

✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428

राजुरा(दि.१३मार्च):-बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल राजुरा यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका मंगला माकोडे यांची उपस्थिती होती.

तर प्रमुख अतिथी म्हणून अध्यक्ष सतीश धोटे, उपाध्यक्ष मनोहर साबणानी, सचिव भास्करराव येसेकर, संचालक मधुकरराव जानवे , अविनाश निवलकर , अल्का सदावर्ते , आदर्श प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, आदर्श हायस्कूल चे मुख्याध्यापक सारिपुत्र जांभुळकर यांची उपस्थिती होती. तर सत्कारमूर्ती म्हणून राजुरा पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक प्रविणा पडोळे , राजुरा नगर परिषद च्या नवनिर्वाचित नगरसेविका संध्या चांदेकर, महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघाच्या उपाध्यक्षा संध्या मधुकरराव पिंपळकर यांची उपस्थिती होती.

सत्कारमूर्तींचा शॉल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व रोपटे कुंडी देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सानिका येरणे हिने केले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका नलिनी पिंगे यांनी केले व आभार वैष्णवी जाधव यांनी मानले. यावेळी विद्यार्थिनी निशा वसाके, निधी चाफले यांनी महिला दिनावर आपले मनोगत व्यक्त केले तर इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनि बालविवाह आणि मुलींच्या समस्या अधोरेखित करणारे नृत्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. 

——————————————–

*प्रविणा पडोळे, पोलिस उप निरीक्षक पोलिस स्टेशन राजुरा* 

         महिलांनी स्वतः मधील कला कौशल्याना पुढे आणत स्पर्धा परीक्षा व इतरही क्षेत्रात स्वतःच्या नावाचा ठसा उमटवला पाहिजे. कुठल्याही संकटात खंबीरपणे उभे राहून त्यांचा सामना करा. सायबर क्राइम, मोबाईलचे व्यसन यापासून स्वतःचा बचाव करा. आई – वडील आणि आपल्या गुरुजनांचे मार्गदर्शन घेऊन आयुष्यात खूप पुढे जा, यशस्वी व्हा असे प्रतिपादन प्रविणा पडोळे यांनी केले.

——————————————–

*संध्या मधुकरराव पिंपळकर, उपाध्यक्षा, महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ* 

          स्त्रियांनी स्वतःच्या कर्तृत्वाने सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात महिलांना कार्य करण्याची संधी उपलब्ध आहे. फक्त त्या संधीचे सोने करून स्व ची जाणीव ठेवा आणि स्वताला सिद्ध करा. सोशल मीडिया, मोबाईल, डिजिटल व्यसनाच्या आहारी न जाता पुस्तके वाचनाची सवय लावा असे प्रतिपादन संध्या मधुकरराव पिंपळकर यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here