Home महाराष्ट्र राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत गंगाखेड येथे वाचादोष शस्त्रक्रिया शिबीर: १३ विद्यार्थ्यांवर यशस्वी...

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत गंगाखेड येथे वाचादोष शस्त्रक्रिया शिबीर: १३ विद्यार्थ्यांवर यशस्वी उपचार

135

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.7मार्च):–राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत गंगाखेड तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी उपजिल्हा रुग्णालय,गंगाखेड येथे (दिनांक ६ मार्च शुक्रवार) रोजी मायनर सर्जरी वाचादोष शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले.वैद्यकीय अधीक्षक डॉ. हेमंत मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात तालुक्यातील १३ विद्यार्थ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या.या शिबिरात प्रसिद्ध कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ.तेजस तांबोळी यांनी शस्त्रक्रिया पार पाडल्या.शस्त्रक्रियेच्या प्रक्रियेत डॉ.झाम्बरे तसेच तज्ज्ञ निलेश गणाचार्य,मालाताई घोबाळे, संगीता केंद्रे,सुमेधा नागरगोजे आणि प्रशांत राठोड यांनी सहकार्य केले.

शिबीर यशस्वी पार पाडण्यासाठी डॉ.योगेश मल्लूरवार,डॉ.कैलास चांदकर, डॉ.असमा सय्यद, प्रेमकला खुरदे,राजकुमार फड, मनोज नाव्हेकर,मनीषा माने, पल्लवी माने आणि कौशल्या हजारे यांनी परिश्रम घेतले.

या शिबिरामुळे वाचादोष असलेल्या विद्यार्थ्यांना योग्य वेळी उपचार मिळाल्याने त्यांच्या आरोग्याबरोबरच शैक्षणिक आणि सामाजिक जीवनातही सकारात्मक बदल होण्यास मदत होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here