


✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.6मार्च):-गुरुवार दिनांक 05 मार्च रोजी सकाळपासुन गंगाखेड तालुक्यातील खळी या गांवातील गोदावरी नदीपात्रात “अवैध वाळु”उपसा विरोधात किसान सभा आणि खळी गांवाच्या ग्रामस्ताच्या वतीने जलसमाधी आंदोलन केले असुन त्या गोदावरी नदीपात्रात केनीच्या सहयाने अवैध वाळु उपसा करताना आढळुन आले.
असुन यावेळी तीन जी.सी.बी पैकी एक जी.सी.बी आढळुन आली असल्याचा पंचानामा गंगाखेड तहसिल कार्यालयातील महसुल विभागाने केला.यावेळी नायब तहसिलदार अजिम अली,तलाटी गव्हाणे,मंडळअधिकारी मुलगीर हे आंदोलन ठिकाणी उपस्थित होती.यावेळी गंगाखेड पोलिस ठाणेचे पोलीस निरिक्षक श्रीकांत डोंगरे यांच्या मार्गदर्शानाखाली खळी गांवात चौंखपोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले होते.
या दरम्यान आंदोलनकर्ता काॅग्रेड ओकार पवार यांनी जो प्रर्यंत तालुका प्रशासन व पोलीस प्रशासन त्याच्यावर कार्यवाही करत नाही.तो प्रर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा पवित्र घेतला होता.परंतु महसुल प्रशासनाने आश्वासन दिल्यामुळे आंदोलनाला तात्पुर्ती स्थगिती दिली आहे.यावेळी गांवातील किसान मोर्चाचे जिल्हा सचिव काॅग्रेड ओकार पवार,वामन ढोंबळे,विजय सोनर,माऊली करवर आदी महाराष्ट्र राज्य किसान सभाचे पदाधिकारी आणि खळी गांवातील ग्रामस्थान मोठया संख्येने आंदोलनात सहभाग होता.














