Home महाराष्ट्र जिजाऊ नागरी सहकारी पत संस्था चिमूर येथे जिजाऊ जयंती साजरी

जिजाऊ नागरी सहकारी पत संस्था चिमूर येथे जिजाऊ जयंती साजरी

124

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

 चिमूर(दि.14जानेवारी):- जिजाऊ नागरी पत संस्था चिमूर येथे जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता जिजाऊचे प्रतिमेचे पूजन श्रीमती वंदना शेषकर व संचालिका सौ. डॉ. पोर्णिमा खानेकर यांच्या हस्ते व दीपप्रज्वलाने करण्यात आली. 

                                             प्रथमतः जिजाऊ वंदना घेण्यात आली. जिजाऊ वंदने नंतर कर्ज समिती प्रमुख प्रा. डॉ. संजय पिठाडे यांनी जिजामातेच्या केलेल्या त्यागाबद्दल व छत्रपती शिवाजी राजे घडविण्यात त्यांच्या योगदानाबद्दल माहीती दिली. पतसंस्थेचे अध्यक्ष रामभाऊ खडसिंगे यांनी जिजामातेसारखे प्रशासकीय कार्य कर्मचाऱ्यांनी करावे असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रम प्रसंगी संचालक प्रा. डॉ. चंद्रभान खंगार, व्यवस्थापक मिलींद जांभूळे, रुपाली राणे, शुभम भुडे, प्रथमेश इंगळे, स्वप्नील मसराम, वसुली अभिकर्ते श्री विठ्ठल इंगळे, सौ वर्षा घेटिया इत्यादी उपस्थित होते.

  “तुमच आमच नात काय”, “जय जिजाऊ जय शिवराय” च्या गजरात जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here