Home चंद्रपूर प्रभाग चार मधून अपक्ष उमेदवार पुष्पा रामटेके यांचे पारडे जड

प्रभाग चार मधून अपक्ष उमेदवार पुष्पा रामटेके यांचे पारडे जड

132

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

घुग्घूस नगरपरिषदेच्या प्रभाग रचनेनुसार प्रभाग क्रं 4 मध्ये सर्व साधारण (ब )गटामधून अपक्ष उमेदवार म्हणून पुष्पा रामटेके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून यांचे बोध चिन्ह कंगवा आहे. पुष्पा रामटेके यांनी यापूर्वी सुद्धा ग्रामपंचायत ची निवडणूक लढविली होती. यामुळे त्या सर्व परिचित आहे त्यांचा दांडगा अभ्यास आणि सर्व नागरिकांशी मनमिळावू स्वभाव व “डोअर टू डोअर “प्रचार यामुळे राजकीय नेत्यांची पळती वाट भुई सपाट होणार आहे. शिक्षित, प्रामाणिक, तंत्रज्ञानाशी सुसंगत आणि सामाजिक भान असलेल्या सेवाभावी पुष्पा रामटेके या निवडून आल्या तर गाव, तालुका, जिल्ह्यापासून ते राज्यापर्यंत एक नवे परिवर्तन घडवू शकते. राजकारणात येण्यासाठी पक्ष आवश्यक नाही, पैसा आवश्यक नाही. आवश्यक आहे ध्येय, दृष्टिकोन आणि धैर्य. युवक, युवती, महिला हे फक्त राष्ट्राचे भविष्य नाहीत तर ते वर्तमानाचे परिवर्तनकर्ता आहेत. स्वच्छ विचार आणि स्वच्छ मन घेऊन राजकारणात उतरलेली एक महिला एका पिढीची दिशा बदलू शकतो.

गावात रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, आणि संस्कार, हेच खरे राजकारणाचे मुद्दे आहेत. हे मुद्दे ओळखून काम करणारी प्रत्येक महिला म्हणजे लोकशाहीचा खरा रक्षक आहे. राजकारणात प्रवेश म्हणजे सत्तेसाठी झगडणे नाही, तर समाजासाठी जबाबदारी घेणे आहे. प्रत्येक मतदार, प्रत्येक नागरिक आणि विशेषतः प्रत्येक महिलांनी हा विचार मनात ठेवून एक वेगळे कार्य करावे.

‘राजकारण म्हणजे समाजसेवेचे सर्वाधिक प्रभावी माध्यम आहे. ‘आता वेळ आली आहे, युवकांनी, युवतीनी, महिला व पुरुषांनी फक्त मतदान करायचे नाही, तर उमेदवारी दाखल करून नवा आदर्श निर्माण करायचा आहे. राजकारणात प्रवेश करून समाजासाठी स्वच्छतेचा, विकासाचा आणि प्रामाणिकतेचा नवा अध्याय लिहायचा आहे. त्यामुळे, बदल हवा असेल तर शब्द नव्हे, सहभाग हवा. ‘राजकारणाला महिला विचारांची नवी झळाळी द्या. कारण आजचे राजकारण जर महिला विचारांनी भरले, तर उद्याचे भारत अधिक सुंदर, न्याय आणि सशक्त होईल. बाकी आता हे सर्व काही आजच्या महिलावर अवलंबून आहे, हेच कटू सत्य आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here