Home महाराष्ट्र पांढरवाडी येथे सर्व एसटी बसेस थांबवाव्यात महिला अधिकार परिषदेची मागणी

पांढरवाडी येथे सर्व एसटी बसेस थांबवाव्यात महिला अधिकार परिषदेची मागणी

109

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(सातारा)(दि.3डिसेंबर):-सातारा पंढरपूर रोडवरील पांढरवाडी हे मोठे गाव असून सदर गावच्या सभोवती कोळेवाडी,गोडसेवाडी,बाराबीघा

खरातवस्ती,जायकरवस्ती,रोमणवस्ती,राजवाडा,कापसेवस्ती,जाधववाडी अशा बारा वाड्या वस्त्या आहेत असे असताना सकाळी व सायंकाळी फक्त एक ते दोन गाड्या येथे थांबतात.लांब पल्ल्याच्या गाड्यांसह सर्व एसटी बसेस येथे थांबवाव्यात अशी मागणीचे निवेदन महिला अधिकार  वतीने तहसीलदार व आगारप्रमुख यांना देणेत आले आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, सोलापूर,अक्कलकोट,बार्शी,पंढरपूर,सातारा,महाबळेश्वर,मेढा अशा लांब पल्ल्याच्या गाड्या सतत या रस्त्यावरून ये जा करीत असतात परंतु एकही गाडी येथे थांबत नाही त्यामुळे प्रवाशांना दिवसभर ताटकळत थांबावे लागते.

              दहिवडी हे तालुक्याचे ठिकाण येथून २० किलोमीटर असून शासकीय कामे,दवाखाने व महाविद्यालयीन शिक्षणासाठी लोकांना व विध्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते.पांढर वाडी येथे इयत्ता ७ वी पर्यंत शाळा असून पुढील शिक्षणासाठी महिमानगड व पुसेगाव या ठिकाणी जावे लागत आहे परंतु एस टी बसेस थांबत नसल्याने विद्यार्थी,महिला,वृद्ध यांची खूप गैरसोय होत आहे विद्यार्थ्यांना वेळेवर पोहचता येत नाही त्यांचे नुकसान होत आहे,गरजूना वेळेवर उपचार मिळत नाहीत,शासकीय कामे वेळेत होत नाहीत तरी या ठिकाणी सर्व एस टी बसेस थांबवाव्यात अशी मागणी करण्यात आली असून मागणी मान्य न केलेस सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देणेत आला आहे.

निवेदनावर अनिता मदने,कल्पना खरात,आशा बुधावले,जयश्री मदने,पूजा पाटोळे,सिद्धांतिका मदने,संगीता पाटोळे,बेबी मदने,रुक्मिणी जाधव,यमुना मदने,लता मदने,सत्वशीला मदने,कांचन कांबळे,छाया खरात,नंदा खरात यांच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here