Home खेलकुद  चार वर्षाच्या चिमुकल्याचा आंतरशालेय जिम्नास्टीक स्पर्ध्येत द्वितीय क्रमांक

चार वर्षाच्या चिमुकल्याचा आंतरशालेय जिम्नास्टीक स्पर्ध्येत द्वितीय क्रमांक

150

✒️कात्रज(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कात्रज(दि.30नोव्हेंबर):-मुलांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर ते काहीही करु शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे…कु.विवांश आदित्य डाकलिया.या चार वर्षाच्या चिमुलक्याने जिम्नास्टीक स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावत शाळेचे त्याच्या शिक्षकांचे,आई वडिलांचे त्याबरोबरच कात्रज परिसरात एक प्रकारे मानाचा तुरा मिरवल्याच समाधान मिळत.आईच्या पाठिंब्याने त्याने हे यश मिळवले. हिंजेवाडी येथील राजीव गांधी इन्फोटेक पार्क येथे झालेल्या आंतरशालेय क्रिडा स्पर्धेमध्ये कु.विवांश याने जिंंम्नास्टीक स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला.या यशामध्ये एस.के.जिंंम्नास्टीक येथील प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण त्याने घेतले तो सॉलिटेअर किड्स या शाळेतील तो विद्यार्थी आहे.

आपला मुलगा मोठ्या यशाच्या शिखरावर पोहचावा ही प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते.आणी त्याला योग्य वेळी पाठबळ मिळाले तर यश हमखास पदरात पडतेच.कष्ट केले तर फळ नक्कीच मिळते या उक्ती प्रमाणे विवांश ची आई त्याला प्रोत्साहन देण्याच काम करत असते.वेगवेगळ्या उपक्रमात त्याला सहभागी होण्यास त्या विवांश ला प्रोत्साहीत करत असतात.आणी तोही तेवढ्या आवडीने प्रत्येक गोष्ट शिकत असतो.लहाण वयातच संस्कार केले तर ते कायम आपल्या आचरणात राहतात यामुळे त्याला या वयातच शैक्षणिक संस्कारा बरोबरच धार्मिक शिक्षणाचीही गोडी लागल्याचे पाहायला भेटते.

लहाण मुलांच्या भावविश्वात बदल होत चालले आहेत हे द्वारे अधोरेखीत होते.आधुनिक युगामध्ये सोशल मिडिया व मोबाईलच्या युगात नविन पिढीचे दुर्लक्ष होत असताना पालकांनी त्यांच्या बौद्धीक पातळी व उत्साह टिकवण्यासाठी खेळाकडे वळायला हवे.

*खेळ आणि खेळ खेळल्याने विद्यार्थ्यांना त्यांचा स्वाभिमान, सामाजिक कौशल्ये आणि आत्मविश्वास सुधारण्यास मदत होते. ते त्यांना वेळेचे व्यवस्थापन आणि शिस्त शिकवते. शिवाय, हे करिअर मार्ग किंवा छंद म्हणून देखील वापरले जाऊ शकते. याशिवाय, हे विद्यार्थ्यांना तणाव आणि नैराश्य कमी करण्यास मदत करते.-(सौ. रेश्मा आदित्य डाकलिया*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here