


✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील)
धरणगाव(दि.29नोव्हेंबर):- शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे आधुनिक भारताचे शिल्पकार, सत्यशोधक, क्रांतीसुर्य महात्मा जोतिराव फुले स्मृतिदिनाचे औचित्य साधत शाळेत निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी डी पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका एम के कापडणे होते. मान्यवरांच्या हस्ते महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. निबंध स्पर्धेत मराठी भाषेतुन प्रथम जया सोनवणे, द्वितीय सिद्धार्थ बैसाणे, तृतीय राज व पुरुषोत्तम पाटील, उत्तेजनार्थ उमेश माळी, लीलाधर माळी व इंग्रजी भाषेतून प्रथम वैभव माळी ,द्वितीय श्वेता भोई, तृतीय शितल भोई उत्तेजनार्थ दिव्या भोई. या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शालेय शैक्षणिक साहित्य देऊन अभिनंदन करण्यात आले.
प्रमुख व्याख्याते व्ही टी माळी यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांचे सामाजिक – शैक्षणिक कार्य विस्तृतपणे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष एम के कापडणे यांनी फुले दाम्पंत्य आपल्यासाठी आदर्श आहेत त्यांच्या विचारांवर चालूया असा संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी डी पाटील तर आभार एच डी माळी यांनी मानले.














