Home महाराष्ट्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात एनसीसी दिवस साजरा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात एनसीसी दिवस साजरा

113

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.24नोव्हेंबर):-डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयामध्ये 3 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एनसीसी नागपूर च्या पत्रानुसार एनसीसी विभागाच्या वतीने राष्ट्रीय छात्र सैनिक दिवस साजरा करण्यात आला. त्या अनुषंगाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले महाविद्यालयाचे 3 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एनसीसी च्या वतीने राष्ट्रीय छात्र सैनिक दिनाच्या निमित्ताने दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी छात्र सैनिकांद्वारे शपथ घेण्यात आली. एनसीसीच्या इतिहासावर आधारित निबंध स्पर्धा पोस्टर्स स्पर्धा, वृक्षारोपण करण्यात आले. निबंध स्पर्धा व पोस्टर्स स्पर्धे करिता ब्रह्मपुरी पब्लिक स्कूलचे प्राचार्य रीमा कांबळे तथा उप प्राचार्य अमन मेश्राम हे उपस्थित होते.

वृक्षारोपण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेश कांबळे यांच्या मार्गदर्शनात संस्थेच्या सदस्या डॉ. स्निग्धा कांबळे मराठी विभागाचे प्राध्यापक वैभव गोसावी असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट सरोज शिंगाडे आणि महाविद्यालयातील छात्र सैनिक यांच्या उपस्थितीत पार पडले. त्यानंतर छात्र सैनिकांनी राष्ट्रीय कॅडेट स्कोर ची माहिती समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी समाज जागृती पर रॅलीचे आयोजन केले. रॅली महाविद्यालयातून गांधीनगर शारदा कॉलनी सरकारी दवाखाना पोलीस वसाहत या भागात जनजागृती करीत महाविद्यालयात परत आली. रॅलीत देशाभिमान जागृत करणाऱ्या व राष्ट्राची सैन्य तुकडी असलेल्या राष्ट्रीय छात्र सैनिक दिवसाच्या निमित्ताने भारत माता की जय राष्ट्रीय कॅडेट कोर्स जिंदाबाद यासारखे नारे लावीत जनजागृती करण्यात आली

हे विविध उपक्रम एनसीसी विभागाच्या प्रमुख असोसिएट एनसीसी ऑफिसर सरोज शिंगाडे यांच्या मार्गदर्शनात पूर्णत्वास नेले याप्रसंगी या उपक्रमांमध्ये पन्नास एनसीसी छात्र सैनिकांनी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here