Home चंद्रपूर इन्स्पायर करिअर अकॅडमीचा पुन्हा एकदा विजयाचा डंका

इन्स्पायर करिअर अकॅडमीचा पुन्हा एकदा विजयाचा डंका

395

▪️तीन विद्यार्थ्यांची शासकीय सेवेत भव्य निवड

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.23नोव्हेंबर):-संपूर्ण विदर्भात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या इन्स्पायर करिअर अकॅडमी, ब्रह्मपुरी या प्रतिष्ठित संस्थेने पुन्हा एकदा यशाचा नवा इतिहास रचला आहे. संस्थेतील तीन विद्यार्थ्यांची शासकीय सेवेत निवड होऊन संस्थेचा गौरव अधिक वृद्धिंगत झाला आहे.

यामध्ये प्रियंका सुरपाम हिची औरंगाबाद पोलिस विभागात निवड झाली असून, मंगला गुरनुले व प्राची नागपुरे यांची महाराष्ट्र सुरक्षा दल (MSF) मध्ये निवड झालेली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन आणि योग्य दिशादर्शन करून यशाकडे घेऊन जाण्याचे काम इन्स्पायर अकॅडमी सातत्याने करत असल्याचा हा आणखी एक पुरावा ठरला आहे.

इन्स्पायर करिअर अकॅडमी ही ब्रह्मपुरीतील सर्वाधिक रिझल्ट देणारी अग्रगण्य संस्था म्हणून परिचित आहे. आजपर्यंत या संस्थेमधून मोठ्या संख्येने विद्यार्थी विविध शासकीय सेवांमध्ये रुजू झालेले आहेत. या संस्थेतून PSI, STI, ASO यांसह अनेक प्रशासकीय अधिकारी तयार झाले असून, अनेक विद्यार्थी पोलीस दलात, सुरक्षा दलात तसेच इतर विविध शासकीय विभागात यशस्वीरीत्या कार्यरत आहेत.

ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची जाणीव करून देणे, योग्य अध्ययन पद्धतीची ओळख करून देणे आणि त्यांच्या मनामध्ये स्पर्धेची आवड निर्माण करणे या ध्येयाने ही संस्था अविरत कार्यरत आहे. कठोर परिश्रम, उत्कृष्ट अध्यापन आणि परिणामकारक मार्गदर्शन यामुळे इन्स्पायर करिअर अकॅडमीने आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल केले आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संस्थेच्या संचालिका सौ. एकता गुप्ता, मार्गदर्शक प्रा. देवानंद सर, प्रणय पीठाले, शितल भाजीपाले, प्रवीण प्रधान, विवेक खरवडे, भागडकर सर दीपक सेमस्कर सर,मनोहर आंबोरकर सर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. त्यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here