


▪️संविधान दिनानिमित्त नेफडो संस्थेचा पुढाकार.
✒️सौ.सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428
राजुरा(दि.17नोव्हेंबर):-येणाऱ्या संविधान दिनानिमित्याने नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा गडचांदुर तालुका कोरपना च्या वतीने गडचांदूर शहरातील व परिसरातील घरकाम करणाऱ्या महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या नागपूर विभाग महिला उपाध्यक्षा सुनैना तांबेकर, संघमित्रा ताकसांडे, निशा डफाळे, शीला शेट्टी, कोरपना तालुका महिला अध्यक्षा उषा टोंगे, उपाध्यक्षा अरुणा सालवटकर, सचिव विजया नामेवार, संघटिका सुलभा कुरेकर , शीतल धोटे, स्मिता विरुटकर, किरण अहिरकर, लीना लांजेकर, माया टिकले, सविता विहिरे, सीमा वरारकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
गडचांदूर शहर व परिसरातील घरकाम करणाऱ्या महिलांना साड्या वाटप करून मानवता विकासाचे कार्य केले. आपल्या घरातील कामे करतांना अत्यंत धावपळीच्या वेळात घरकाम करणाऱ्या महिलांची साथ मिळते. त्यांना आर्थिक मोबदला जरी दिला तरीही संपूर्ण घराची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली जाते. त्यामुळे घरमालक आणि घरकाम करणाऱ्या महिलांमधे एक परिवाराचा सदस्य म्हणून आपण बघितले पाहिजे या विश्वासाने नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या महिलांनी पुढाकार घेत हा स्तुत्य उपक्रम राबविला.
पर्यावरण संवर्धन, वृक्ष लागवड व सहकार्यवृत्ती जोपासून मानवता विकासासाठी आपला हातभार लागावा याकरिता तालुका कोरपना गडचांदुर शहर टीम ही कार्यरत असून वेगवेगळे उपक्रम राबवून समाजाचे आपण देणे लागतो या भावनेतून कार्य करीत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजया नामेवार यांनी केले. प्रास्ताविक अरुणा सालवटकर यांनी तर आभार लीना लांजेकर यांनी मानले. घरकाम करणाऱ्या महिलांसाठी दरवर्षी मेळावा आयोजित करून त्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे व त्यांच्या समस्या सोडविणे यासंदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले.














