


▪️सोयाबीन तर गेलीच पण हातात येणारे धान पिकही गेली
✒️प्रमोद राऊत(चिमूर प्रतिनिधी)
चिमूर(दि.7नोव्हेंबर):-तालुक्यातील खडसंगी कृषी व तलाठी मंडळ कार्यालय अंतर्गत येत असलेल्या केसलबोडी जाणाऱ्या मार्गावर रेंगाबोडी टोला (सोनेगाव वन) येथील शेतकरी अभिमान उद्धव राऊत यांची चार एकर शेती असून, शेतात सोयाबीन व धान पिक लावलेली आहेत. सोयाबीन पिक तर आधीच पूर्णतः गेली मात्र आता हातात येणारे धान पिकांचे सुद्धा परतीच्या अतिवृष्टी पावसामुळे धान पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळं तोंडांत येणारा घासही आता निसर्गराज्याने बळीराजाच्या तोंडांत येणार घास ही हिरावला आहे. त्यामुळं शेतकरी वेटाकुटीस आलेला असून, जगावे की मरावे असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
राज्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी नगदी पिक म्हणून सोयाबीन पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. मात्र निसर्गाने साथ न दिल्यामुळं शेतकऱ्यांना वेळोवेळी दगा मिळाला आहे. खरीप हंगामाची शेती करण्यासाठी शेतकऱ्यांनी जिकडून मिळेल तिकडून कर्ज काढून कर्जबाजारी होऊन शेती केली जात आहे. मात्र निसर्गाच्या अवकाळीने दगा दिल्याने शेतकऱ्यांचे शेत पिकांचे मोठे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळं पुन्हा एकदा सोयाबीन पिकानंतर शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला असल्याने आता शेवटच्या व अवकाळी पाऊसाने शेतकऱ्यांचे धान तीन एकरामधील बांधातील धान पिक पूर्णतः भुईसपाट झाले आहे. त्यामुळं प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी अभिमान उद्धव राऊत या शेतकऱ्यांनी केली आहे. प्रशासनाला केली आहे.














