Home मनोरंजन डॉ.के.पी.गारोळे एज्युकेशन सेंटरचा राष्ट्रीय स्तरावर बोलबाला

डॉ.के.पी.गारोळे एज्युकेशन सेंटरचा राष्ट्रीय स्तरावर बोलबाला

175

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.6नोव्हेंबर):-शहरातील डॉ.के.पी.गारोळे एज्युकेशन सेंटर,या नामांकित शैक्षणिक संस्थेला राष्ट्रीय स्तरावर अभिमानास्पद सन्मान प्राप्त झाला आहे.शाळेच्या संचालिका तथा मुख्याध्यापिका किरण किशन गारोळे यांना बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्डने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.पुद्दुचेरीच्या माजी राज्यपाल आणि भारताच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी डॉ.किरण बेदी यांच्या हस्ते तसेच पद्मभूषण पुरस्कार विजेती,ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती व बॅडमिंटन आयकॉन सायना नेहवाल यांच्या उपस्थितीत (दिनांक ४ नोव्हेंबर) रोजी मुंबईतील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित भव्य समारंभात बेस्ट प्रिन्सिपल हा सन्मान प्रदान करण्यात आला. 

या कार्यक्रमात संस्थेच्या संचालिका व मुख्याध्यापिका किरण किशन गारोळे यांना त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या निष्ठावान प्रयत्नांबद्दल आणि शैक्षणिक नेतृत्वगुणांबद्दल बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच,किरण बेदी आणि सायना नेहवाल यांच्या हस्ते सन्मान संस्थेतील विज्ञान विभागाचे प्राध्यापक ओम तिवारी आणि इंग्रजी विभागाचे प्राध्यापक हरी कऱ्हाळे यांनाही इंडियन ऑलिम्पियाड फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनातील उल्लेखनीय कार्याबद्दल बेस्ट टीचर अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले. मुंबई येथे पार पडलेल्या या समारंभात देशभरातील नामांकित शिक्षणतज्ज्ञ, विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती तसेच अनेक शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या अभिमानास्पद यशानंतर संस्थेचे संस्थापक व संचालक डॉ.के.पी.गारोळे यांनी सर्व सन्मानित शिक्षकांचे अभिनंदन करून म्हटले की,हा सन्मान केवळ आमच्या संस्थेचाच नाही, तर संपूर्ण गंगाखेडच्या शैक्षणिक प्रगतीचा आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी क्षण आहे.या राष्ट्रीय सन्मानामुळे डॉ.के.पी.गारोळे एज्युकेशन सेंटर,गंगाखेड या संस्थेचा मान वाढला असून हा क्षण गंगाखेडवासीयांसाठी अभिमानाचा ठरला आहे.

संस्थेचे शैक्षणिक सल्लागार प्रा.तुकाराम हुरगुळे,प्राचार्य प्रा.एम.एम.सूरनर,उपप्राचार्य जगदीश मंदोडे सर्व शिक्षकवर्ग आणि पंचक्रोशीतील पालकवर्ग यांनी या यशाबद्दल डॉ.संचालिका किरण गारोळे,शिक्षक ओम तिवारी,हरी कराळे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, भविष्यातही त्यांनी आणखी उंच शिखरे गाठावीत,अशा शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here