


✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100
▪️शाळांकडून मीटर अनुक्रमांकी,थकीत वीज बिल, वीज कनेक्शन संदर्भात मागवली माहिती*
▪️शाळेच्या वीज बिलाचा ग्रामपंचायत वर भार का?
म्हसवड: माण तालुक्यात लोकवर्गनी ,दानशूर व्यक्तीकडून शिक्षणाचा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असलेले संगणक शाळांमध्ये बसवण्यात आले आहेत . तालुक्यात बहुतांश शाळा डिजिटलाइझ आहेत. मात्र शिक्षण विभागाकडून शाळांना अतिरिक्त निधी मिळत असून ही शाळांच्या वीज बिलाचा अतिरिक्त भार ग्राम पंचायतींवर का? ग्राम विकास विभागाचा शिक्षण ,आरोग्य हे अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असताना तालुक्यात या विभागाकडे साफ दुर्लक्ष का? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अभयसिंह जगताप यांनी पत्रकार परिषदेत केला होता.
परिणामी महाराष्ट्र राज्य वीज वितरण ने लाईट बिले थकीत असल्याने ना इलाजास्तव शाळांची वीज कनेक्शन कट केली आहेत. संगणक शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असून विजेअभावी संगणक व प्रणाली धूळ खात पडली आहे. परिणामी शिक्षक बांधवाना ,विद्यार्थ्यांना संगणक ज्ञान देण्यास मर्यादा पडत आहेत. याकडे सरकारच्या चुकीच्या निर्णयाने गदा आली आहे. ग्राम विकासात शिक्षण आणि आरोग्य विभाग हे अत्यंत महत्वाचे घटक आहेत. आरोग्य विभाग स्वतः लाईट बिले देत असतात. मग शाळांचीही वीज बिले ग्राम पंचायत कडून न घेता अतिरिक्त निधीतून दिली जावीत. अशी मागणी अभय सिंह जगताप यांनी केली होती.
अभय सिंह जगताप यांनी यावर आवाज उठवताच त्या अनुषंगाने माण मधील प्रत्येक शाळांची पंचायत समिती ने माहिती मागवली असून वीज बिले ग्राहक नंबर , कट केलेली कनेक्शन, थकीत अमाऊंट यासंदर्भात शाळा प्रशासनाला तातडीने माहिती देण्यासंदर्भात पंचायत समिती ने सूचना केल्या आहेत.
या संदर्भात बी डी ओ यांच्याशी प्रतिनिधीने संपर्क साधला असता “शाळांना अतिरिक्त निधी उपलब्ध नसतो. साधारण ५०००च्या आसपास ग्रँड येते. त्यामध्ये वीज बिले भरणा करण्यास अडचणी येतात. त्यामुळे ग्राम पंचायत ला शासनाने सूचना केल्या आहेत.














