Home चंद्रपूर ग्रामगीता महाविद्यालयात रा.से.यो. आठवडा उत्साहात साजरा.

ग्रामगीता महाविद्यालयात रा.से.यो. आठवडा उत्साहात साजरा.

109

 

 

चिमूर – ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे दिनांक 22 सप्टेंबर 2025 ते दिनांक 29 सप्टेंबर 2025 या कालावधीत प्राचार्य डॉ. सुनंदा आस्वले यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “राष्ट्रीय सेवा योजना आठवडा” उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजना आठवडा अंतर्गत दिनांक 22 सप्टेंबर, 2025, रोज सोमवारला महाविद्यालयातील विद्यार्थी प्रिय प्राध्यापकांची निवड करून त्यांच्या सत्कार व व्याख्यान आयोजित करण्यात आले. 23 सप्टेंबर, 2025, रोज मंगळवार ला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताची अखंडता कायम ठेवण्याच्या दृष्टिकोनातून केलेल्या कार्याबद्दल विशेषतः ‘ऑपरेशन पोलो’ बद्दल माहिती देण्यात आली. दिनांक 24 सप्टेंबर, 2025, ला महाविद्यालयात उत्साहाने ‘राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस’ साजरा करण्यात आला, तसेच महाविद्यालय परिसराची स्वच्छता करण्यात आली. दिनांक 25 सप्टेंबर, 2025, रोज गुरुवार ला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त ‘अंत्योदय दिवस’ साजरा करण्यात आला. दिनांक 26 सप्टेंबर 2025 ला ‘जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस’ हा महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करून साजरी करण्यात आली. दिनांक 27 सप्टेंबर, 2025, रोज शनिवार ला ‘विश्व पर्यटन दिवसाच्या’ औचित्य साधून विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गड-किल्ल्यांची माहिती देण्यात आली, तसेच चिमूर तालुक्यातील ‘सात बहिणी डोंगर’ आणि ‘घोडाझरी’ या पर्यटन स्थळांची स्वच्छता करण्यात आली. दिनांक 28 सप्टेंबर, 2025, रोज रविवार ला शहीद भगतसिंग जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या जीवनावर आणि कार्याबद्दल व्याख्यान आयोजित करण्यात आली. तसेच दिनांक 29 सप्टेंबर, 2025, रोज सोमवारला ‘जागतिक हृदय दिवस’ साजरा करून ‘राष्ट्रीय सेवा योजना आठवड्याच्या’ समारोप करण्यात आला. या सर्व उपक्रमात महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती आणि सक्रिय सहभाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here