Home लेख पुन्हा प्रत्यय आला, कु-हाडीचा दांडा गोतास काळ…!!

पुन्हा प्रत्यय आला, कु-हाडीचा दांडा गोतास काळ…!!

195

 

 

 

संविधानातील आरक्षण तत्वाला संपवण्यासाठी. पुढचे एक पाऊल म्हणून एस. सी. आणि एस. टी. आरक्षणाचे ऊपवर्गीकरण करणे आणि एस. सी. एस. टि. आरक्षणाला क्रिमीलेअर लावणे. या विषयाला कायदेशीर ठरविण्यासाठी पाताळयंत्री सवर्णांनी एस. सी. न्यायाधिशाचा बेमालूमपणे वापर करून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात एक परिच्छेद एस. सी. न्यायमूर्ती यांनाच लिहायला सांगितला आणि एस. सी. असलेल्या न्यायमूर्तींनी याचिकेत एस. सी. एस. टी. क्रिमिलेअरची मागणी नसतांना क्रिमिलेअर चा उल्लेख करुन एक परिच्छेद लिहला आणि निकाल दिला गेला….!!
सुप्रीम कोर्टाच्या निकाला मुळे सवर्णांचा रस्ता मोकळा झाला. सुप्रीम कोर्टातील ब्राह्मण न्यायमूर्तींनी एस. सी. एस. टी. आरक्षणाच्या संदर्भात टिपण्णी केली असती तर ती समजण्या सारखी होती परंतु इथे बिभीषण रस्ता दाखवतं आहे…!!
आता भाजपचे महाराष्ट्रातील सरकार एस. सी. एस. टी. आरक्षणाचे ऊपवर्गीकरण करुन क्रिमिलेअर लावणार अशी घोषणा झाली आहे….!!
सरन्यायाधीश पदावर आमच्या जातीच्या माणसाची निवड झाली म्हणून आनंद व्यक्त करणा-या, सत्कार आणि हारतुरे घालणाऱ्या गैबाण्या महारांनो, आता तरी भानावर येणार आहात की, नाही.??

कॉंग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून येणारा आमच्या जातीचा आहे म्हणून आनंद व्यक्त करणा-या किंवा मतं देणा-या आंबेडकरवादी भाबड्या लोकांनी आतातरी कॉंग्रेस आणि भाजपा या मनुवादी राजकीय पक्षांचे घरभेदी षडयंत्र समजून घेतले पाहिजे….!!
फक्त डिग्री घेण्याला काय अर्थ आहे रे गैबाण्या.? म्हणे आमच्या समाजात शिक्षणाचे प्रमाण खूप वाढले.? शिकून काय साध्य केले.? तुला घरभेदी ओळखता येत नाहीत.हे वास्तव आहे…!!

तुझ्या जातीचा स्वार्थी माणूस हेरुन सवर्णांनी तुझ्या मुला नातंवडांचे आरक्षणाला संपवण्याचा यशस्वी प्रयत्न चालविला आहे. आणि तु त्या घरभेदी माणसाचा, कु-हाडीच्या दांड्याचा सत्कार करतोस, हारतुरे घालतोस, त्याची वाहवा करतोस, सोशल मीडियावर प्रशंसा करतोस, वृत्तपत्रात रकानेच्या रकाने भरुन त्याच्या बुद्धीवादी असल्याचे दाखले देतोस.? तुझ्या बुद्धीची कीव करावीशी वाटतेय.शिकूनही इतके कसे रे तुम्ही गबाळे.???
शिकले नसते परंतु आंबेडकरी विचारांशी प्रामाणिक राहिले असते तरीही आज आंबेडकरवादी राजकारण यशस्वी झाले असते असे प्रामुख्याने जाणवते….!!
सवर्ण मानसिकतेच्या राजकीय पक्षांनी तुझ्या हुरडफुक्या स्वभावाचा पुरेपूर फायदा घेण्याचे ठरविले आहे आणि म्हणून आता मतलबी, स्वार्थांध, समाजविकाऊ तुझ्या जातीच्या माणसाला आमदारकी, खासदारकी देऊन तुझी मतं लाटण्याचं राजकीय षडयंत्र कॉंग्रेस आणि भाजपा सारखे राजकीय पक्ष खेळतं आहेत आणि तु त्या षढयंत्राचा बळी ठरतं आहेस.तुझ्या राजकीय नादानी मुळे संविधान धोक्यात आले आहे हे लक्षात घे जरा???
मनुवाद्यांच्या षढयंत्राचा बळी असलेला शिक्षित माणूस जेव्हा मी आंबेडकरवादी आहे म्हणून शेखी मिरवतो तेव्हा माझ्या सारख्या माणसाच्या तळपायाची आग मस्तकात जाते….!!
भावळ्या तुला २०२४ मध्ये ढोंगी, सत्तालोलूप पुरोगाम्यांनी “विचारवंत” असं बिरुद लावून हरभ-याच्या झाडावर बसविले.
त्या हरभ-याच्या झाडावर बसुन तु काय केले? आठवतेय का तुला.? कु-हाडीचा दांडा झाला. आंबेडकरवादी राजकीय पक्षांना संपवण्यासाठी तुझा वापर केला गेला. आतातरी दुरुस्त हो.???
मनुवादी संविधान संपवण्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व प्रयोग करणार आहेत. त्यांचा तो अजेंडा आहे. संविधानवादी बहूसंख्य असुनही संविधान बचाव साठी कार्यतत्परता दाखवतं नाहीत हा दोष घालवून ऐकीने पुढे जावे लागेल….!!
घरभेदी ओळखून त्यांचा बंदोबस्त करावा लागेल. सामाजिक किड संपवणे अगत्याचे आहे. राजकीय भाबळेपणा संपवून राजकीय शहाणपणं अंगिकारावे लागेल. सवर्णांच्या षढयंत्राचा पर्दाफाश करणारे संविधानवादी बौद्धिक मनुष्यबळ कार्यरत होणे ही काळाची गरज आहे…!!
संविधान बचाव चा नारा देऊन मनुवादी कळपात मेंढरा सारखं खाली मान घालून जाणं टाळावं लागेल….!!

लेखक -प्रा.भास्कर भोजने
(फुल शाहू आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार तथा जेष्ठ आंबेडकरी विचारवंत, बाळापूर, अकोला)
मो.9960241375

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here