Home महाराष्ट्र कै.वेणूताई पद्मने एक प्रभावी व्यक्तिमत्त्व

कै.वेणूताई पद्मने एक प्रभावी व्यक्तिमत्त्व

201

 

 

 

 

 

पथ्रोट,जि.अमरावती येथील कै. विश्रामजी व कै.अनुसयाबाई वानरे यांची प्रेमळ व लाडकी सुकन्या, दैनिक प्रदर्शन व साप्ताहिक मानवक्रांतीचे संपादक सुदाम वानरे, भीमराव वानरे, ज्ञानेश्वर वानरे या सर्व बंधुंचे शेवटपर्यंत बंधुप्रेम कायम ठेवणाऱ्या आदर्श बहीण, लग्नानंतर पद्मने कुटुंबाची जीवनभर कष्टमय सेवा करून सासू-सासऱ्यांचे मन जिंकणाऱ्या आदर्श स्नुषा, सुखात व दुःखात पतीदेवाची साथ देऊन त्यांचा संसार सुखी करणाऱ्या आदर्श धर्मपत्नी, पाच मुलामुलींचा योग्य सांभाळ करुन त्यांना सुसंस्कारित करणाऱ्या आदर्श माता, तीनही जावायांना मुलाप्रमाणे समजून मुलिंचा संसार सुखी करणाऱ्या आदर्श सासूआई, सर्व नातू व पणतुंना म्हातारपणातही जवळ घेऊन त्यांचे पूर्ण लाड पुरविणाऱ्या आदर्श आजी, माझ्या सासुआई कै.वेणुताई पुंडलिकराव पद्मने यांना चतुर्थ स्मृतिदिनानिमित्त विनम्र आदरांजली अर्पण करतो

दि .११ सप्टेंबर २०२५ ला असलेल्या त्यांच्या चतुर्थ स्मृतिदिनानिमित्त त्यांचे आदर्श व्यक्तिमत्त्व शब्दबद्ध करण्याचा हा माझा अल्पसा प्रयास.
स्वभाव तो नम्र । वर्तन विनम्र।
जीवनात सदा। आनंदी मन ।।
अशा विनयशील स्वभाव असलेल्या माझ्या सासुआई कै. वेणुताई पुंडलिकराव पद्मने या अमृतमहोत्सवी वर्षात वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी २०२१ च्या सप्टेंबर मासामध्ये अल्पशा आजाराने जवाहर नगर,अकोला येथे पंचतत्त्वात विलिन झाल्या त्यावेळी त्यांचे पद्मने कुटुंब, माहेरचे वानरे कुटुंब आणि सामाजिक बांधिलकी स्वीकारुन त्यांनी जीवन जगताना ज्यांना ज्यांना साथ दिली,मदतीचा हात दिला असे सर्वच दुःखसागरात बुडाले होते; कारण सासुआईचे या सर्वांशीच प्रेमाचे नाते होते, स्नेहबंध होते.
आनंदी आनंद।प्रेमाच्या या घरी।।
वाटे दारोदारी । वेणुताई।।
असा आनंद वाटण्याचा त्या प्रयत्न करीत;म्हणूनच त्यांच्या जीवनातील गोड स्मृतींचे स्मरण सर्वच करतात.
कै.वेणुताई पुंडलिकराव पद्मने यांचा जन्म पथ्रोट,जि.अमरावती येथे १९४६ सालातील मे महिन्याच्या वीस तारखेला वारकरी पंथातील अध्यत्मिक वातावरणात झाला;कारण त्यांच्या मातोश्री कै.अनुसयाबाई आणि वडील कै.विश्रामजी वानरे हे वारकरी पंथातील अध्यत्मिक भक्त होते.अनेक धर्मग्रंथातील ओव्या व अभंग मातोश्रीच्या मुखोद्रत होते.घरी आलेल्या गरिबांना त्या समतेची वागणूक देऊन सढळ हाताने मदत करायच्या. मातोश्रीच्या जनसेवेच्या व अध्यात्मिक वातावरणात माझ्या सासुआई कै. वेणुताईंचे बालपण गेल्यामुळे त्यांनी पुढे लग्नानंतर स्वतःच्या आईवडिलांच्या सुसंस्कारांचा गोडवा आपल्या पाचही मुलांमध्ये वाटला व त्यांना घडविले आणि स्वतःच्या संसारासोबतच इतरांचाही संसार सुखी करण्याचा प्रयत्न केला.
सासुआई कै.वेणुताई यांचे पती कै.पुंडलिकराव पद्मने हे Central Execise (केंद्रीय उत्पादन शुल्क) मध्ये Superintend (अधिक्षक) पदावर असल्यामुळे त्यांचे स्थलांतर व्हायचे,तेव्हा संसाराची पूर्ण जबाबदारी सासुआईवर यायची.नागपूर,अमरावती व अकोला येथे संसारिक जीवन जगताना त्यांच्या दारी समस्या घेऊन आलेल्या गरिबांना त्या नेहमीच योग्य मार्गदर्शन करुन त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करायच्या, वेळप्रसंगी त्यांना मदत करुन मातोश्रीचा वारसा जपण्याचा प्रयत्न करायच्या आणि त्यांना
धरा सज्जनांची संगत ।
सोडा दुर्जनांची सोबत ।।
जीवन होईल तुमचं ।।
आदर्शाच माहेरघर।
असे आदर्श जीवन जगण्याचे त्या मार्गदर्शन करीत.हेच जीवनतत्त्व स्वतःच्या मुलांना सांगून सुसंस्कार देऊन त्यांनी घडविले. त्यांच्या तीन मुलींचा व दोन मुलांचा संसार सुखी होण्याचे रहस्य सासुआईंनी त्यांना दिलेल्या या सुसंस्कारात आहे असे म्हणता येईल. त्या सुस्वभावी,मनमिळाऊ, स्पष्टवक्त्या,विनयशील होत्या. सासुआईंनी
मुलांना मुलींना सुसंस्कार दिले।मार्गदाता होऊन जीवन घडविले ।।
सासुआईंनी आपल्या पाल्यांना,नातवांना इंजिनिअर, डॉक्टर,शिक्षक ,प्रोजेक्ट मॅनेजर होताना बघितलं. त्यांचा थोरला सुपुत्र श्री. राजेंद्र हा Central Railway मध्ये कल्याण येथे Sr. Section Engineer पदावरून सेवानिवृत्त झालेला आहे . त्यांची कन्या कु.अनुष्का (नात) अमेरिकेला M . S . होऊन तेथे कंपनीमध्ये मॅनेजर आहे तर सुपुत्र चि. केयुर (नातू) हा नवीमुंबई येथे Engineering ला आहे. सासुआईचा धाकटा सुपुत्र श्री संजय हा Nulife Com-pany मध्ये Manager आहे तर त्याचा सुपुत्र (नातू) चि. सौम्य हा मुंबई येथे B . E . होऊन तिथेच कंपनीमध्ये मॅनेजर आहे तर धाकटा चि.समृद्ध (नातू) हा अकरावी सायन्सला अकोला येथे आहे .सासुआईची थोरली कन्या सौ. सुनिता एकनाथराव घुडे (पुणे) यांची थोरली कन्या सौ. अनुराधा अपूर्व कालरा (नात) ही कलकत्ता I l M मधून M.B.A. झाली असून ती बंगलोर येथील Deloitte Company मध्ये Senior Consultant या पदावर कार्यरत आहे. थोरला सुपुत्र श्री मयूर ( नातू) हा । .।.M.. Kozhikode येथून M.B.A. झाला असून तो मुंबई येथे Company मध्ये Manager आहे तर धाकटी कन्या सौ.मेघा राहूल पिंपळकर (नात) ही नागपूर येथून B.D.S. झाली असून डॉक्टर आहे. मधली मुलगी सौ.ज्योती अरुण बुंदेले (अमरावती) ही B.Sc.. B.Ed.B.A. (Eng. Soc.), B.P.Ed. असून High School Teacher आहे तर त्यांचा थोरला सुपुत्र चि.सुमेध (नातू) हा I . I.M. कलकत्ता येथून M.B.A. आलेला असून तो बंगलोर येथील कंपनीमध्ये Manager आहे तर धाकटा सुपुत्र चि. साकेत (नातू) हा बंगलोर येथे Symbiosis College मध्ये M.B.A चे शिक्षण घेऊन पुणे येथील कंपनीमध्ये मॅनेजर आहे . सासुआईची धाकटी कन्या सौ. मालती अरविंदराव जाधव (ठाणे) B.Com. असून त्यांची थोरली कन्या कु. तन्वी (नात) ही I.I.T. Guwahati येथून B.Tech. झालेली असून ती दिल्ली येथे Sowaka Fitness ही स्वतःची नवीन Company स्थापन करून चालवित आहे.तर धाकटी कन्या कु. अनुजा (नात) ही V.I.T. Bombay येथून B.E. झाली असून ती America येथील Washington D.C. येथे M.S. झाल्यावर सध्या
U. S. Boston येथे Mackenzie कंपनीमध्ये मॅनेजर आहे .आपल्या या नातवांचे पुढिल यश बघायला आज त्यांच्या प्रेमळ आजी कै.वेणुताई आपल्यात नाहीत याचे खूप दुःख नातवांसह सर्वच नातेवाईकांना होत आहे.
माझ्या सासुआई कै.वेणुताई पुंडलिकराव पद्मने यांनी जीवन जगताना कन्या, भगिनी, पत्नी, स्नुषा, माता, सासू, आजी या सर्व भूमिका चोखपणे बजावून समाजात एक आदर्श निर्माण केला.
पुर्तता या जीवनाची ।
माझ्या मृत्युत व्हावी ।।
जीवनापासून माझ्या ।
मला मुक्ती मिळावी ।।
अशी विचारधारा असलेल्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाच्या धनी कै. वेणुताई पुंडलिकराव पद्मने यांना दि.११ सप्टेंबर २०२५ ला त्यांच्या चतुर्थ स्मृतिदिनानिमित्त मी विनम्र आदरांजली अर्पण करतो.

 

 

 

प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
अमरावती, मो. ८०८७७४८६०९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here