


*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*
राजुरा – महाराष्ट्रातील वन विभागात कार्यरत वनपालाना वनक्षेत्रपाल म्हणून पदोन्नती यादी जाहीर केली परंतु अमलबजावणी करण्यात दिरंगाई होत असल्याने पात्र झालेले वनपाल पदोन्नतीच्या आधीच सेवानिवृत्त होत असल्याने हा यांचेवर अन्याय असून याची दखल घेऊन तात्काळ आदेशाची अमलबजावणी करावी तसेच वंचीत झालेल्या वनपालांना वनक्षेत्रपाल चा दर्जा देण्याची मागणी कास्ट्राईब वन विभाग कर्मचारी संघटनेने केली असून अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे
मुख्यमंत्री यांनी 100 दिवसाच्या विशेष कृती महत्वाकांक्षी कार्यक्रम अंतर्गत पदोन्नती हा विषय त्यात समाविष्ठ केला होता त्यानुसार वन विभागात पदोन्नती करिता आवश्यक असलेल्या प्रक्रियेनुसार वनपाल ते वनक्षेत्रपाल पदोन्नतीची प्रतीक्षा यादी 9 जानेवारी 2025 रोजी प्रकाशित करण्यात आली होती त्याप्रमाणे आवश्यक बाबींची पूर्तता करण्यात येऊन 25 जून रोजी विभागीय पदोन्नती समितीची सभेनंतर पदोन्नती करिता पात्र असलेल्या कर्मचार्याची निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे
मात्र 8 महिन्याचा कालावधी लोटूनही वन विभागाकडून अद्यापही पदोन्नतीचे आदेश निर्गमित करण्यात आले नाहीत त्यामुळे जे वनपाल पदोन्नती साठी पात्र होते परंतु कोणतेही कारण नसताना पदोन्नती आदेश रोखून ठेवण्यात आले आहे अश्यारीतीने शासकीय दिरंगाई मुळे दरम्यानच्या काळात नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेत आणि वनक्षेत्रपाल या पदोन्नती पासून वंचीत राहावे लागले आहे
तेव्हा शासनाने याची दखल घेऊन पदोन्नती पासून वंचीत झालेल्या वनपालांना पदोन्नतीच्या मानीव दिनांक देऊन पदाची वेतनश्रेणी लागू करण्यात यावी तसेच प्रलंबित असलेली पदोन्नती समितीच्या शिफारशीनुसार जे वनपाल वनक्षेत्रपाल पदासाठी पात्र आहेत अशा वनपाल यांचे पदोन्नतीचे आदेश 7 दिवसाचे आता काढण्यात यावी नाहीतर कास्ट्राईब वन विभाग कर्मचारी संघटना धरणे आंदोलन करेल असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष (गडचिरोली) नामदेव बन्सोड,चंद्रपूर जिल्हाध्यक्ष अनंता राखुडे, आशिष चक्रवर्ती, प्रभाकर सोनडवले यांनी दिला आहे














