


*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*
शिक्षक दिनानिमित्त गोवरी येथे सत्कार.
राजुरा- काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने सेवेत असणाऱ्या शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केल्याच्या बातम्या आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जोपर्यंत महाराष्ट्र शासन लागू करत नाही तोपर्यंत त्याची अंमलबजावणी होत नाही. नवनियुक्त शिक्षकांसाठी ही परीक्षा बंधनकारक केल्यास हरकत नाही मात्र महाराष्ट्र सरकारने सेवेतील शिक्षकांना टीईटी परीक्षा बंधनकारक केल्यास सभागृहात सभागृहाबाहेर आंदोलन छेडले जाईल असा इशारा आमदार सुधाकर अडबाले यांनी गोवरी येथे दिला.
शिवाजी हायस्कूल गोवरी च्या वतीने शिक्षक दिनानिमित्त आमदार श्री सुधाकरराव अडबाले यांचा सस्नेह सत्कार आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते. याप्रसंगी वेकोलिच्या शक्तिशाली ब्लास्टिंग मुळे शाळेच्या इमारतींना तळे जात आहेत त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे.वेकोलि ने सिएसआर फंडांतर्गत वेकोलीग्रस्त गावांतील शाळांना मदत केली पाहिजे याबाबत जिल्हाधिकारी बैठकीत मुद्दा मांडला जाईल असे आश्वासन दिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉक्टर के आर टेंभुर्णी होते तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच सौ. आशाताई उरकुडे ,विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे माजी जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, सेवानिवृत्त शिक्षक दिलीप मोरे, विलास कौरकर सुभाष शेंडे, प्रभाकर शेरकी, गावातील प्रतिष्ठित नागरिक मारुती पाटील लोहे, माजी सरपंच विठ्ठलराव पाचभाई हरिश्चंद्र जुनघरी, पोलीस पाटील बंडूजी चीडे ,शिवराम पाटील लांडे, सुधाकर पाटील पाचभाई, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कासवटे ,सदस्य मारुती लांडे ,ज्येष्ठ शिक्षक तथा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद चलाख यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी शाळेच्या वतीने आमदार सुधाकर अडबाले यांचा शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला . आमदार सुधाकर अडबाले यांचा जीवन कार्याचा परिचय सोनाली मोहारे यांनी सादर केला.तसेच शालेय मंत्री मंडळाच्या वतीने सुद्धा सन्माननीय आमदार यांना विद्यार्थ्यांनी भेटवस्तू देऊन अभिनंदन केले. तसेच केशवराव ठाकरे व दिलीप मोरे यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला याप्रसंगी विद्यार्थ्यांनी लेझीम पथक ढोल ताशाच्या गजरावर मान्यवर पाहुण्यांचे स्वागत केले .तसेच याप्रसंगी शालेय उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धा व कलादालनाचे उद्घाटन माननीय आमदार सुधाकर अडबाले यांच्या हस्ते संपन्न झाले. विद्यार्थ्याने चित्रकलेच्या माध्यमातून रेखाटलेल्या चित्रांचे मान्यवरांनी कौतुक केले .याशिवाय गणेशोत्सव स्पर्धे अंतर्गत विद्यार्थ्यांनी कडधान्यातून रेखाटलेले गणेश मूर्तींचे चित्रांचे अवलोकन पाहुण्याने केले व बाल विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शाळेच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाबाबतही याप्रसंगी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक आनंद चलाख यांनी केले. प्रास्ताविकेतून शाळेच्या वाटचाली बद्दल माहिती व गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली तसेच शिक्षक दिनानिमित्त आमदार अडबाले सर यांच्या प्रेरणादायी कार्यांचा आढावा घेतला. अध्यक्ष मनोगत मुख्याध्यापक डॉक्टर टेंभुरने यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले व आमदार अडबाले सरांच्या असामान्य कार्यांचा गौरव केला. कार्यक्रमाचे संचालन सानिया भगत व नेहा बोबडे हिने केले. आभार प्रदर्शन चांदणी पोतराजवार हिने मानले. कार्यक्रमाचे आयोजनासाठी शिक्षकेतर कर्मचारी अभिजीत कूळसंगे, अरुण उरकुडे, शंकर लांडे, अनिल डाखरे व शालेय मंत्रिमंडळातील सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.














