


महाराष्ट्रात इतर सणामध्ये पोळा हा सण मोठ्या सणामध्ये मोडतो. या सणाला मोठ्या प्रमाणात सर्वच नागरिक मोठ्या उत्सहात साजरा करीत असतात. म्हणूच पोळा एक बांधिलकी जोपसणारा सण आहे.
भारताची परंपरा ही जगापेक्षा अनोखी आहे. मोठ्यांचा आदर करणे ही भारतीय संस्कृती आहे. पोळा हा सण बैलांना पूजने इत पर्यंत न राहता सर्व नागरिक एकमेकांना भेटून शुभेच्छा देतात. नवीन कपडे परिधान करून पोळा सणात उत्सहाणे सहभागी होतात. काळानुरूप बदल बघता बैलांची संख्या दिवसेंदिवस लुप्त होत चालली. परिणामी जुन्या दिवसाप्रमाणे सणाचा आनंद आणि उत्सुकता फारशी राहिली नाही. पोळा म्हटले की बाहेर नौकरीवर असणारे किंवा कामासाठी बाहेर असलेले परिवारातील सदस्य हमकास आपल्या घरी हजर व्हायचे आणि आपल्या परिवारासोबत किंवा गावातील मंडळी सोबत बांधिलकी जपायचे परंतु बदलता काळ बघता बांधिलकी कुठेतरी लुप्त होत चालली आहे हे चित्र बघायला मिळत आहे. परंपरे नुसार भारतात खूपसारे सण साजरे केले जातात. ते विज्ञानाच्या दृष्टीने महत्वाचे नसले तरी एक आपुलकी, स्नेह, आणि बांधिलकी यांना जपणारे आणि टिकवणारे सण आहेत. आताच्या स्मार्ट जगात लोकांकडे वेळ नसला तरी काही सणामुळे आपल्या परिवारामध्ये बांधिलकी जपून ठेवलेली आहे.
लेखक – रामभाऊ मदनकर, रा. अर्हेर-नवरगाव ता. ब्रम्हपुरी, जिल्हा चंद्रपूर














