Home नागपूर “राष्ट्रीय सुरक्षेसाठी तरुणांची भूमिका आणि विकास” या विषयावर नागपूरच्या व्हीएनआयटी येथे 22...

“राष्ट्रीय सुरक्षेसाठी तरुणांची भूमिका आणि विकास” या विषयावर नागपूरच्या व्हीएनआयटी येथे 22 ते 23 ऑगस्ट दरम्यान परिषदेच आयोजन

85

 

 

 

नागपूर,- नागपूरच्या विश्वशरैय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (व्हीएनआयटी) येथे “राष्ट्रीय सुरक्षेसाठी तरुणांची भूमिका आणि विकास” या विषयावर दोन दिवसीय परिषदेचे आयोजन 22 ते 23 ऑगस्ट दरम्यान करण्यात आले आहे. शुक्रवारी, 22 ऑगस्ट रोजी सकाळी 10:00 वाजता, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या राष्ट्रीय परिषदेचे ऑनलाइन उद्घाटन होणार आहे. या परिषदेचा मुख्य विषय अंतर्गत राष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक सुरक्षा आणि सायबर सुरक्षा यासारख्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर केंद्रित आहे.

ही परिषद युथ फॉर नेशन या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जात असून व्हीएनआयटीच्या सभागृहात ही परिषद होणार आहे. या परिषदेत तरुणांना सक्षमीकरणासाठी प्रोत्साहित केले जाणार असून तरुणांचा सहभाग हा आत्मनिर्भर आणि विकसित भारताकरिता मिळण्यासाठी ही परिषद महत्त्वाची ठरेल असे प्रतिपादन परिषदेचे संरक्षक आणि व्हीएनआयटीचे संचालक प्रा. प्रेमलाल पटेल यांनी यावेळी केले.

देशातील प्रख्यात तज्ज्ञ या विषयांवर मार्गदर्शन करतील.पटेल यांनी यासंदर्भात माहिती देतांना सांगितल की, अंतर्गत सुरक्षेच्या विषयावर लेफ्टनंट जनरल विनोद खंडारे PVSM AVSM SM, प्रा. डी. एस. चौहान, कमांडर वीरेंद्र कुमार जैटली, लेफ्टनंट जनरल व्ही. के. चतुर्वेदी PVSM AVSM SM, लेफ्टनंट जनरल शोकिन चौहान, श्री भास्कर राव (माजी डीजीपी, कर्नाटक), डॉ. रवींद्र सिंगल (पोलिस आयुक्त, नागपूर) आणि संदीप पाटील (आयजी, नक्षलविरोधी कारवाया, महाराष्ट्र) तरुणांशी संवाद साधतील.

या दोन दिवसीय परिषदेत अंतर्गत सुरक्षा ,सायबर सुरक्षा तसेच आर्थिक सुरक्षा या विषयावर विविध तज्ञ, पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच माध्यमतज्ञ यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार असून, व्हीएनआयटीच्या सुमारे 300 विद्यार्थ्यांनी या परिषदेसाठी नोंदणी केली आहे. एम्स, आयआयएम नागपूर तसेच शहरातील विविध खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी देखील या परिषदेत उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here