


कोल्हापूर (प्रतिनिधी) : चला, भारतीय होऊया! ही भूमिका घेऊन भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत, तीन गटात प्रथमच होणार्या सर्वात मोठ्या भव्य राष्ट्रीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून भारत माझा देश आहे! हा निबंध स्पर्धेचा मध्यवर्ती विषय आहे.
सदर निबंध स्पर्धा तीन गटांमध्ये पहिला गट वय वर्षे 15 पर्यंत, दुसरा गट वय वर्षे 25 पर्यंत, तिसरा गट सर्वांसाठी खुला असून प्रत्येक गटासाठी तीन लाख प्रथम क्रमांकाचे ज्यात एक लाख रोख आणि दोन लाखांची पुस्तके तर दोन लाख द्वितीय क्रमांकाचे ज्यात पन्नास हजार रोख आणि दीड लाखांची पुस्तके, उत्तेजनार्थ 50 पारितोषिके ज्यात प्रत्येकी पाच हजारांची पुस्तके मिळणार असून बक्षीस प्रत्येक गटासाठी स्वतंत्र आहेत. सर्वाधिक स्पर्धक सहभागी होणार्या पंचवीस शाळा, महाविद्यालयांना 25,000/- हजारांची पुस्तके असे विशेष पारितोषिक देण्यात येणार असून सहभागी प्रत्येक स्पर्धकास 300/- रुपयांची पुस्तके आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
सविस्तर माहिती हवी असल्यास फोन न करता 9112472109 या व्हाट्सअपच्या नंबरला सविस्तर माहिती पाठवा असा मेसेज पाठवावा किंवा मानवतावादी सांस्कृतिक चळवळ, 873, क/2, सी वॉर्ड, सिध्दीश्री प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर-416002 येथे प्रत्यक्ष येऊन भेटावे.
सदर निबंध स्पर्धेचे प्राचार्य डॉ. राजेखान शानेदिवाण, अनिल म्हमाने, भरत रसाळे, प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे, डॉ. दीपककुमार वळवी, डॉ. एस. एस. पाटील, डॉ. एन. एस. जाधव, डॉ. शोभा चाळके-म्हमाने, सुरेश केसरकर, भरत लाटकर, ॲड. कृष्णा पाटील, डॉ. श्रीपाद देसाई, प्रा. किसनराव कुराडे, प्रा. टी. के. सरगर, ॲड. करुणा विमल, डॉ. अमर कांबळे, मदन पवार, विश्वासराव तरटे आदी मान्यवर मार्गदर्शक असून अंतिमा कोल्हापूरकर, अर्हंत मिणचेकर, आदित्य म्हमाने, अमिरत्न मिणचेकर मुख्य समन्वयक आहेत.
अधिक माहिती हवी असल्यास 9112472109 यावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.













