Home चंद्रपूर रोटरी क्लब चिमूर कडून पोलिस स्टेशन चिमूर येथे रक्षाबंधन उत्सव साजरा

रोटरी क्लब चिमूर कडून पोलिस स्टेशन चिमूर येथे रक्षाबंधन उत्सव साजरा

187

 

चिमूर – रोटरी क्लब चिमूर तर्फे आज दि. 14 ऑगस्ट 2025 रोज गुरुवारला ला चिमूर पोलिस स्टेशन मधील पोलिस बंधूंना रोटरी क्लब परिवारातील महिला सदस्यांनी राखी बांधून रक्षाबंधन सन आनंद उत्साहात साजरा केला.

बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन रक्षाबंधनाला बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देत असतो. “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” या ब्रीदवाक्यानुसार सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास पोलिस बांधव सदैव दक्ष आणि सज्ज असतात. आज सकाळी 11 वाजता पोलिस स्टेशन चिमूर येथे आनंद उत्साहात पोलिस निरीक्षक श्री. दिनेश लबडे सर व इतर पोलीस बंधूंना राखी बांधून त्यांच्यासोबत महिला भगिनींनी रक्षाबंधन साजरा केला.महिलांनी सर्वांना राखी बांधून आपले दायित्व पार पाडले.
यामध्ये सौ.सपना गंपावार,डॉ. पौर्णिमा खानेकर, सौ. प्रियांका बघेल,सौ.सपना बेत्तावार,सौ.दुर्गा धनोरे,सौ.राजश्री ताकसांडे,सौ.निकिता वरघने यांचा सहभाग होता.

यावेळी या कार्यक्रमास चिमूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री. दिनेश लबडे, सहायक पोलिस निरीक्षक,श्री. मल्हारी ताळीकोटे,श्री. दीपेंद्र चांदे, पोलिस उपनिरीक्षक दिप्ती मरकाम,रोटरी क्लब चिमूर चे अध्यक्ष विनोद भोयर, सचिव राकेश बघेल,पवन ताकसांडे, डॉ.महेश खानेकर,विशाल गंपावार,कैलास धनोरे,अभिजित बेहते,गुरुदास ठाकरे,जयवंत वरघने, परेश दंदे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here