


प्रतिनिधी -जगदीप वनशिव
चाकण – येथे महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा राजगुरुनगर स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे प्रतिष्ठान व मानस मैत्री फाउंडेशन चाकण यांच्या संयुक्त विद्यमानाने श्रावणसांज काव्य मैफिल व पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष गाढवे यांनी आयोजन केले होते
कार्यक्रमाचे उद्घाटक नितीन शेठ ( सदस्य महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ) गोरे महेश शेवकरी हरिदास कड़ (ज्येष्ठ पत्रकार गीतकार )प्रा डॉ संदीप सांगळे ( अध्यक्ष मराठी अभ्यास मंडळ ) कवी लेखक देवा झिंजाड प्रियंका गोरे मधुकर गिलबिले विशाल नायकवडी शाम राक्षे नारायण करपे मनोहर शेवकरी( चाकण नगरसेवक ) प्रास्ताविक संतोष गाढवे यांनी केले ते म्हणाले स्वर्गाला स्पर्श करणारा कवी असतो
ज्येष्ठ पत्रकार गीतकार हरिदास कड म्हणाले कवींचाही पक्ष असावा कवींचे सरकार आले पाहिजे कवी रानमातीतून तयार होतो बंगल्यातून जन्माला येत नाही कवी लेखक कलावंत सुख आणि दुःखाने भरलेले आहेत प्रत्येक माणूस मोठा असतो कवी जगताचा धनी अन् देश जागवतो महेश शेवकरी (नगरसेवक ) म्हणाले दहा कविता ऐकून माझ्या आयुष्याचे कल्याण झाले .मी ही नक्कीच कविता लिहिल असे मला वाटते
नितीन शेठ गोरे म्हणाले कवी चिंतन करणारे असतात समान आनंद देणारा कवी असतो वेदना काव्यातून मांडत समाजाला वेगळी दिशा देण्याचे महान कार्य कवी लेखक करतात जगणे ही एक कविताच आहे समाज घडत जातो असा आशावाद मांडला
प्रमुख पाहुणे डॉ प्रा संदीप सांगळे म्हणाले जीवनाचा अनुभव लिहीत गेलं की कविता लयबद्द साहित्य निर्माण झाले कि समाज जीवनाचा आरसा आहे परंपरा वसा वारसा स्वप्न सत्यात उतरवली की माणूस आदर्श बनतो महाराष्ट्र शूरवीर क्रांतिवीर संतांची भूमी आहे कलात्मक प्रतिभा लेखक कलावंत समाज घडवणारा लेखक कवी असतो कविता लिहिणे सोपे नाही समाज बघण्याचा डोळसपणा असावा लागतो कलाकृती भाव ज्याला टिपता येतात तोच कलावंत लेखक कवी समाज प्रबोधन करू शकतो असे प्रतिपादन केले
युवा लेखक संवेदनशील हास्यकवी देवा झिंजाड म्हणाले कवितेचा नाद अवघड असतो गाणं ही ओळख होते काळजातून मनामनात शब्द पोहचवता ते शब्द कधी माजी नसतात आजी असतात गौतमीचा नाद लागण्यापेक्षा गौतमाचा नाद लावायला शिकलं पाहिजे याप्रथम सत्राचे सूत्रसंचालन बाबाजी शिंदे यांनी केले
दुसऱ्या सत्रात श्रावणसाज काव्य मैफिलीचे अध्यक्ष माणदेश कविवर्य डॉ लक्ष्मण हेंबाडे यांनी भूषविले प्रमुख पाहुणे लोककवी सिताराम नरके (.राष्ट्रपती पोलीस पदक मानकरी ) प्रियंका गोरे बबन धुमाळ विजया टाळकुटे महाराष्ट्रातील कवी माधव लांडगे साजन पिलाणे विकास आतकरी चंद्रकांत जोगदंड ऋतुजा टेमकर श्रीधर अंभोरे गौतम वाघमारे छगन वाघचौरे दिनेश खैरे संदीप पाचरणे निरंजन ठणठणकर जितेंद्र सोनवणे सिंहल मेळे प्रसन्न कुमार धुमाळ काळूराम येळवंडे पाटील मयूर खानविलकर सुरेखा ठोके माधव पाटील जना बापू पुणेकर सुनिता पडवळ तृप्ती थोरात वंदना खोत चंद्रकांत चाबुकस्वार सागर वाघमारे विजय जाधव शैला जांभुळकर कविता तळेकर अमोल सुपेकर विजय जाधव डी के वडगावकर चेतना कड शकील जाफरी उद्धव परभणीकर सुभाष पांचाळ पांडुरंग वागतकर दशरथ दुनघव मृण्मयी काळे अशा एकशे दहा कवींनी श्रावण पाऊस प्रेम छक्कड अभंग विरह मार्मिक वैचारिक प्रबोधन करणाऱ्या रचना सादर करण्यात आल्या सर्व साहित्यिकांचा वृक्षरोपटे व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले
काव्य मैफिलीचे सूत्रसंचालन महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध निवेदक पत्रकार रानकवी जगदीप वनशिव यांनी आपल्या बहारदार दमदार शैलीत काव्य मैफिलीत रंगत वाढवली रसिकांची मने जिंकली आभार नारायण करपे सर यांनी केले अशाप्रकारे चाकण येथील गुडलक हॉटेल मधील सभागृहात श्रावणसाज .काव्य मैफिल पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला














