Home चंद्रपूर एस. टी. बसच्या अपघातात एकाचा मृत्यू तर अनेक प्रवासी जखमी-रस्त्यालगतच्या दहा फूट...

एस. टी. बसच्या अपघातात एकाचा मृत्यू तर अनेक प्रवासी जखमी-रस्त्यालगतच्या दहा फूट खोल खड्ड्यात कोसळली चिमूर आगाराची एस टी

831

 

 

कार्यकारी संपादक// उपक्षम रामटेके

📱9890940507

✒️ ( पुरोगामी न्यूज नेटवर्क)

शेगाव बू (दि.5 ऑगस्ट) :- वरोरा चिमूर राष्ट्रीय महामार्ग =३५३ ई) वर असलेल्या चारगाव (बु) जवळील नदीच्या पुलाजवळ राज्य परिवहन विभागाची चिमूर आगाराची चिमूर-चंद्रपूर ही बस आज(5ऑगस्ट) दुपारी चिमूर वरून चंद्रपूरला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने चारगाव धरण जवळ इरई नाल्याच्या पुलाजवळ सुमारे १० फूट खोल खड्ड्यात गेल्याने अनेक प्रवासी जखमी झालेले आहे. त्या बस मध्ये एकूण अंदाजे ३५ प्रवासी होते.
अपघात होताच अपघाताच्या आवाजाने परिसरातील शेतात काम करणारे शेतमजूर, शेतकरी यांनी धाव घेऊन तात्काळ जखमींना वाहनाच्या बाहेर काढून शेगाव पोलीस स्टेशन येथे संपर्क केला. जखमींना खाजगी वाहनाने उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
बस चालक सुनील पुसनाके यांना मिरगी येत असल्याची चर्चात्मक प्राथमिक माहिती उपस्थितांकडून मिळाली तसेच बसचा वाहक सुरेश भटाळकर हा गंभीर जखमी असून त्याला सुद्धा उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच शेगाव परिसरातील तसेच चारगावं गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती व शेगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन स्थानिकांच्या मदतीने जखमींना वाहनाच्या बाहेर काढण्यासाठी मदत करीत होते. वृत्तलीहीपर्यंत वाहनातील जखमींची नावे कळु शकली नव्हती परंतु प्राप्त माहिती नुसार एकाचा उपचारर्थ नेत असताना मृत्यू झाली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here