Home चंद्रपूर स्वामी विवेकानंद आश्रमशाळा किरमिरी येथे सेवानिवृत्ती सोहळा संपन्न

स्वामी विवेकानंद आश्रमशाळा किरमिरी येथे सेवानिवृत्ती सोहळा संपन्न

83

 

*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*

राजुरा – दिपक गुलाबराव धानोरकर प्राथमिक मुख्याध्यापक व श्री. राजकुमार जुलमे वसतिगृह कर्मचारी यांचा सेवानिवृत्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सत्कार सोहळ्याला अध्यक्ष म्हणून आदरणीय अँड. श्री. वामनराव चटप माजी आमदार, प्रमुख अतिथी सौ. वंदनाताई चटप, संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. आशुतोषजी चटप, किरमिरी चे माजी सरपंच ताजने पाटील दयानंदजी रामटेके उपसरपंच स्विटी डोंगरे सत्कारमूर्ती श्री. दिपक धानोरकर व राजकुमार जुलमे सपत्निक उपस्थित होते. संस्थेच्या वतीने माजी आमदार अँड. चटप साहेब, सौ. वंदनाताई चटप, व श्री. आशुतोषजी चटप यांच्याकडून शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच अनुदानित आदिवासी संघटना चंद्रपूर चे पदाधिकारी श्री. प्रमोद साळवे, श्री. मनोज आत्राम आणि श्री. संतोष केशेट्टीवार यांनी शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. शाळेतील माध्यमिक मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी देखील शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन श्री. तलांडे सर, प्रास्ताविक श्री. झाडे सर माध्यमिक मुख्याध्यापक यांनी केले. चटप साहेबांनी श्री. दिपक धानोरकर यांच्या उल्लेखनीय 31 वर्षाच्या कार्याचा आलेख मांडला.श्री. आशुतोषजी चटप यांनी अडचणीवर मात करत शाळेला शिखरावर पोहचविण्यात धानोरकर सरांचे योगदान सांगितले. श्री. निखाडे सर, श्री. साळवे सर , श्री. पिंपळशेंडे सर कु. जोगी मॅडम स्त्री अधीक्षिका, कु. उईके मॅडम कु. रामटेके मॅडम व इतर अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करतांना अनेक आठवणींना उजळा दिला. श्री. भगत सर यांनी सुमधुर आवाजात गीत सादर केले व आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील श्री. गोहने सर, श्री. ठाकरे सर, श्री. कावडकर बाबू , श्री. विशाल धानोरकर श्री. लडके, श्री. आमने श्री. कांबळे, श्री. वाढई, श्री. मलगुलवार, श्री. भोयर, श्री. देवगडे, श्री. आडे, श्री. राऊत व सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here