Home महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या गंगाखेड तालुकाध्यक्षपदी उद्धवराव सातपुते यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या गंगाखेड तालुकाध्यक्षपदी उद्धवराव सातपुते यांची निवड

304

 

प्रतिनिधी (अनिल साळवे, 8698566515)

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या गंगाखेड तालुका अध्यक्षपदी उद्धवराव सातपुते यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा इसाद ग्रामपंचायतचे माजी सरपंच उद्धवराव सातपुते यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या गंगाखेड तालुकाध्यक्षपदी पक्षाचे जिल्हाध्यक्ष पाथरी विधानसभेचे आमदार राजेश विटेकर यांनी निवड केली असून त्यांना निवडीचे पत्र दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विभाजना नंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडे राहून सातपुते यांनी गंगाखेड तालुकाध्यक्षपद भूषविले परंतु मध्यंतरी काळात उद्धवराव सातपुते यांनी शरदचंद्र पवार गटाला सोडचिट्टी देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला सातपुते यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या गळ्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या गंगाखेड तालुकाध्यक्ष पदाची माळ पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ.राजेश विटेकर यांनी टाकली.तालुकाध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल सातपुते यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here